मुंबईत घरांची विक्री वाढली, पुण्यात मात्र घटली

मुंबईत घरांची विक्री वाढली, पुण्यात मात्र घटली

विकासकांनी घरांच्या किमती कमी केल्याने व ग्राहकांना खरेदीत चांगल्या सवलती दिल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून घरांच्या विक्रीत ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील आठ शहरांमध्ये घरांच्या विक्रीतील ही वाढ दिसून आली असून त्यात मुंबईचाही समावेश आहे. मात्र पुण्यातील घरांची विक्री घटली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

प्रॉपर्टी कन्सल्टंट नाईट फ्रँक इंडियाने रिअल इस्टेटबाबतचा सर्व्हे केला. यामध्ये दिल्ली-उपनगर, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली. मात्र पुणे आणि कोलकातामध्ये घरांची विक्री घटल्याचे दिसून आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्रीशिवाय राहिलेल्या घरांच्या संख्येत ११ टक्क्यांनी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात बंगळुरूमध्ये सर्वात अधिक २७ टक्के घरांची विक्री झाली आहे. कोलकातामध्ये घरांच्या विक्रीत १० टक्क्यांची घट झाली आहे. तर पुण्यात गतवर्षीच्या तुलनेत १ टक्क्याने घरांची विक्री कमी झाली आहे.

बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना आर्थिक चणचण जाणवत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटमध्ये सावधगिरी दिसून येत असल्याचे सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

First Published on: January 10, 2019 4:32 AM
Exit mobile version