संभाजी भिंडेंना अश्रू अनावर; ‘लवासामुळे अशा घटना घडतात’

संभाजी भिंडेंना अश्रू अनावर; ‘लवासामुळे अशा घटना घडतात’

Sambhaji Bhide : भारताचा राष्ट्रध्वज भगवा करावा, भिडेंच्या शिवप्रतिष्ठानने काढली पदयात्रा

शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली आणि कोल्हापूर भागातील पूरपरिस्थितीचाआढावा घेतला. यावेळी ‘न्यूज१८ लोकमत’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संभाजी भिडे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी या पूरग्रस्त परिस्थितीला लवासासारखे प्रकल्प कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. सांगली, कोल्हापूरात महापुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. ही परिस्थिती पाहून भिडे भाऊक झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाचे देखील कौतुक केले. त्याचबरोबर सांगली, कोल्हापूरातील महापूर २००५ सालाच्या पूरापेक्षा शंभरपटीने मोठा असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात भीम आर्मीचा गोंधळ

लवासाबाबत नेमके काय म्हणाले संभाजी भिडे?

संभाजी भिडे म्हणाले की, राजकारण्यांच्या स्वार्थी न्यामुळेही अशा घटना घडतात. महाराष्ट्रात लवासा प्रकल्प उभारला गेला. तो प्रकल्प निसर्गाचा मुडदा पाडूनच बनला. त्यामुळे निसर्गाचा मुडदा इथेच पडला असे नाही. हा मुडदा गावोगावी पडत आहे. तो थांबवायचा असेल तर निस्वार्थ अंतकरणाने देशासाठीच जगायचे आणि देशासाठी मरायचे असा विचार करायला हवा. मात्र सध्या या विचारांच्या मानसांचा तुटवडा आहे. त्यामुळे हे असे चित्र आहे आणि हे फक्त सांगलीचेच नाही तर संपूर्ण देशात पाहायला मिळेल.’

हेही वाचा – संभाजी भिडेंच्या बैठकीत राडा; २० आंदोलनकर्त्यांना अटक

‘२००५च्या पुरापेक्षा शंभर पटीने मोठा पूर’

संभाजी भिडे म्हणाले की, ‘२००५ साली पूर आला त्यावेळी लोक म्हणत होते की, ६० वर्षांनंतर असा पूर आला आहे. मात्र आता आलेला पूर हा २००५च्या पुरापेक्षा शंभर पटीने मोठा पूर आहे. परंतु, खूप जण याही परिस्थितीत ताठ अंतकरणाने मदत करत आहेत. आईच्या अंतकरणाइतकं सहकार्य लोकांकडून केले जात आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्तेही मदत कार्य करत आहेत. महाराष्ट्रभरातून मदत केली जात आहे.’

हेही वाचा – ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडेंना जामीन

महाराष्ट्र शासनाचे केले कौतुक

संभाजी भिडे म्हणाले की, ‘सैन्य सेनापतीच्या बळावर चालते आणि सेनापती जर कुशल असेल तर उत्तम. महाराष्ट्र शासनाने केबूळकर या अधिकाऱ्यांना पुन्हा या भागात पाठवले. हे फार चांगले काम केले. त्याचबरोबर काळम पाटील यांना देखील महाराष्ट्र शासनाने आणले पाहीजे. ते सेवानिवृत्त झाले आहेत. तरीही शासनाने त्यांना या भागात आणले पाहीजे. कारण काळम पाटील सेनापती म्हणून एकदम योग्य आहेत. यथा राजा तथा प्रजाप्रमाणे जसा नेता तशी जनता ताबडतोब पालटते.’ त्याचबरोबर ‘महापूर कुणा एका माणसाच्या दोषामुळे आलेला नाही. निसर्ग इतका बलवत्तर आणि प्रभावी आहे की आपण त्याच्यापुढे टिकूच शकत नाहीत. पंचमहाभूतापैकी पाणी हे एक आहे. अशा अक्राळ-विक्राळ परिस्थितीत कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. प्रशासन निर्दोष आहे, असेही शंभर टक्के खरे नाही. परंतु, प्रशासनामुळे घडले हे घडले नाही,’ असेही भिडे म्हणाले.

First Published on: August 13, 2019 12:01 PM
Exit mobile version