‘संभाजीनगरमधील दंगलीसाठी समाजसंकटांना खुली सुट; राममंदिर आणि दंगल रोखण्यासाठी फक्त १५ पोलीस’

‘संभाजीनगरमधील दंगलीसाठी समाजसंकटांना खुली सुट; राममंदिर आणि दंगल रोखण्यासाठी फक्त १५ पोलीस’

छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर किराडपुरा भागातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या तरुणांच्या एका गटाचा दुसर्‍या गटाशी बुधवारी रात्री वाद झाला. हा वाद टिपेला पोहचताच दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. अनियंत्रित झालेल्या या जमावाने पोलिसांच्या १५ गाड्यांसह खासगी ३ गाड्यांना लक्ष्य करून जाळपोळही केली. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे सदस्य इम्तियाज जलील यांनी मोठा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, या दंगलीसाठी समाज संकटांना खुली सुट देण्यात आली होती आणि राममंदिर व दंगल रोखण्यासाठी फक्त १५ पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते.

जलील म्हणाले की, दोन्ही गटात राडा झाल्यानंतर इतक्या कमी वेळात त्या ठिकाणी एवढी मुले कशी जमा झाली. ती कुठुन आली आणि कोण-कोण होते, यात कोणाचे कनेक्शन आहे का, हे सर्व शोधण्याची आवश्यकता आहे. कारण त्या दिवशी दोन ते अडीच तासांसाठी समाजसंकटांना खुली सुट देण्यात आली होती. तुम्हाला दंगल करायची आहे, दगडफेक करायची आहे, गाड्या जाळायच्या आहेत, असे आदेश त्यांना देण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.

पोलीसांनी सांगितले की, १३ गाड्या जाळण्यात आल्या आहेत मी स्वत: गाड्या जाळण्यात आलेल्या गाड्या पाहिल्या आहेत. पण या १३ गाड्यांमधील पोलीस कुठे होते. प्रत्येक गाडीत १-१ पोलीस आला होता का? असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी फक्त १५ पोलीस होते मी स्वत: पाहिले. मात्र या १५ पोलिसांवर राममंदिराची सुरक्षा आणि बाहेर जे गाड्या जाळत होते त्यांना रोखण्याची जबाबदारी होती, असे जलील यांनी सांगितले.

अडीच तासामध्ये दंगल करण्यासाठी मुलांना खुली सुट
ज्या दिवशी दंगल झाली त्या दिवशी मोठे अधिकारी, कॉन्स्टेबल, एडीशनल फोर्सस या ठिकाणी नव्हत्या. आपल्याकडे एसआरफीएफच्या साताऱ्याला कॅम्प आहेत. त्यांना छत्रपती संभजीनगरला पोहचायला किती वेळ लागला असता, असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी यावेळी केला. तसेच त्यांनी सांगितले की, अडीच तासामध्ये त्या मुलांना खुली सुट देण्यात आली होती आणि शक्य झाले तर मंदिरामध्येही प्रवेश आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही. त्या १५ पोलिसांना मरण्यासाठी सोडले आहे. बाहेर कोणीही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला खुली सुट दिली आहे तुम्हाला जे करायचे आहे ते करा असा त्यांना आदेश देण्यात आला असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.

मी कोणावरही आरोप करणार नाही
आजच्या परिस्थितीमध्ये मी कोणावरही आरोप करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. मात्र मला एक प्रश्न आहे की, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस या दंगलीप्रकरणी कधी उत्तर देणार आहेत. ते कधी सांगणार की, जेव्हा दंगल घडली तेव्हा याठिकाणी इतके पोलीस होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च केला आहे. या स्मार्ट सिटीमध्ये सगळ शहर सीसीटीव्हीने कव्हर केले आहे. मग त्या सीसीटीव्ही फुटेज पत्रकार परिषद घेऊन जनतेला दाखवा आणि त्यांना सांगा की, इम्तियाज जलील खोटे बोलत आहेत. ते राजनिती करत आहेत. मला तुम्ही खोट सिद्ध करण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
त्यांनी असेही सांगितले की, तुम्हाला जर मला खोट सिद्ध करायचे नसेल तर तुम्ही हे तरी दाखवा की, ज्या दिवशी दंगल झाली त्या दिवशी इतके पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मॉब कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते. पण तुम्ही हे करणार नाही, कारण राम मंदिराच्या आवारात जेवढे पोलीस होते त्यांना सोडून अडीच तास आणखी पोलीस त्या ठिकाणी आलेच नाहीत, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.

First Published on: April 1, 2023 4:20 PM
Exit mobile version