ठाकरेंनी खोक्यांचा एक तरी पुरावा दाखवला, तर .., संजय गायकवाडांचं थेट आव्हान

ठाकरेंनी खोक्यांचा एक तरी पुरावा दाखवला, तर .., संजय गायकवाडांचं थेट आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर ४० आमदारांना घेऊन शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. त्या क्षणापासून ४० आमदारांवर ४० खोके घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेत्यांकडून केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यात जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांनी परखड शब्दांत टीका केली होती. दरम्यान, ठाकरेंनी खोक्यांचा एक तरी पुरावा दाखवला, तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपत बसू, असं थेट आव्हान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

संजय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पहिली गोष्ट तर शेतकऱ्यांचा मेळावा म्हणून त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण जेवढ्या लोकांनी तिथे भाषण केलं, त्यातलं कुणीही शेतकऱ्यांविषयी बोललं नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा, दु:ख, अडचणी किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनानं काय करावं, यावर विरोधी पक्ष म्हणून ते काहीही बोलू शकले नाहीत. तसेच खोके, बोके याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला विषयच नव्हता, असं संजय गायकवाड म्हणाले.

खोक्यांशिवाय गेल्या तीन-चार महिन्यांत त्यांना दुसरा कुठला विषय मांडता आला का? उद्धव ठाकरेंनी सीआयडी वगैरे जेवढ्या यंत्रणा असतील, त्या लावून या खोक्यांचा एक तरी पुरावा आणून दाखवावा. जर त्यांनी असं केलं, तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपत बसू. त्यांनी फक्त एकदा हे सिद्ध करून दाखवावं, असं संजय गायकवाड म्हणाले.

दरम्यान, बुलढाण्यात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे नेल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावरून संजय गायकवाड यांनी ठाकरेंना खोक्यांबाबत थेट आव्हान दिलं आहे.


हेही वाचा : मोदींप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही दरवर्षी राखी पाठवते; भावना गवळींचं


 

First Published on: November 27, 2022 3:36 PM
Exit mobile version