Sanjay Raut : भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण सुरू केले – संजय राऊत

Sanjay Raut : भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण सुरू केले – संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आज अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करून स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. भाजपाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना पक्षात घेऊन त्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे, अशी टीका करत संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “भाजपाने काँग्रेस मुक्त करण्याची घोषणा आता बदलली पाहिजे. कारण भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण सुरू केले आहे. भाजपाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना पक्षात घेऊन त्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. महात्मा गांधींचे काँग्रेस शुद्धीकरण करण्याचे स्वप्न भाजपाने स्वीकारले आहे. भाजपाने काँग्रेसची थेट युती न करता अशा प्रकारे युती करत आहे. यामुळे देशाचे राजकारण बिघडवत आहे. भाजपाला वाटत असेल की, सर्व भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून लोकसभा निवडणुकीत 400 पार करण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. पण भाजपा 200 पार देखील जाणार नाही. राज्यात भाजपाने कितीही फोडाफोडी केली तरी, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपापेक्षा 10 जागा जास्त मिळतील”, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.”

हेही वाचा – Sanjay Raut : “शिवसेना फुटीच्या वेळीच कॉंग्रेसही फुटणार होती”, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

“देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचिन घोटाळा आणि आदर्श घोटाळा कसा झाला हे सांगितले. या क्लिप आजही उपलब्ध आहेत आणि त्यांनी स्वत: च्या क्लिप ऐकाव्या. पंतप्रधान मोदी हे अशोक चव्हाण यांच्याबद्दल काय बोलले होते तेही ऐकावे”, असा सल्ला संजय राऊत दिला आहे.

हेही वाचा – Ashok Chavan: ठरलं! भाजपातच जाणार; अशोक चव्हाणांनी केलं स्पष्ट

भ्रष्टाचाऱ्यांना भाजपामध्ये घेऊन राजकारणात नवा आदर्श

संजय राऊत म्हणाले, “भाजपाने शहिदांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्रात आंदोलन केले होते. त्या शहिदांच्या अपमानाचे आता काय झाले? आता अशोक चव्हाणांना भाजपामध्ये घेऊन त्यांना शहिदांचा अपमान धुवून काढला का? मला वाटते सगळ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपा देशातील राजकारणात नवा आदर्श निर्माण करत आहे.”
.

First Published on: February 13, 2024 1:25 PM
Exit mobile version