घरमहाराष्ट्रAshok Chavan: ठरलं! भाजपातच जाणार; अशोक चव्हाणांनी केलं स्पष्ट

Ashok Chavan: ठरलं! भाजपातच जाणार; अशोक चव्हाणांनी केलं स्पष्ट

Subscribe

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे. काल, 12 फेब्रुवारीला त्यांनी आपल्या पक्षसदस्यत्वाचा तसचं आमदारकीचा राजीनामा दिला होता, त्यानंतर येत्या दोन दिवसांत मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज माध्यमांसमोर येत त्यांनी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे. आज दुपारी 12.30 च्या दरम्यान भव्य पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई येथील भाजपाच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश केला जाणार आहे. (Ashok Chavan Done Will go to BJP Ashok Chavan made it clear)

कुठे आणि कधी होणार पक्षप्रवेश?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 किंवा 12.30 ला मुंबईतील भाजपाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. तसंच, अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखीही काही आमदार त्यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहेत. आता काँग्रेसचे कोणते नेते त्यांच्यासोबत जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

तत्काळ निर्णय का?

केंद्रीय मंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र भाजपाकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन मिळालं आहे. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करतील त्यानंतर ते राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करतील, असं सांगण्यात येत आहे.

काँग्रेसला रामराम

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहा दशकांपेक्षा जास्त काळांहून असलेली काँग्रेसची साथ सोडली. त्यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. महिन्याभरात महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. याआधी मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी हे 4 ते 5 दशकांपासून काँग्रेससोबतच होते. ज्या नेत्यांनी काँग्रेस उभारण्यास सिंहाचा वाटा उचलला, त्यांनीच काँग्रेसचा हात सोडला. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Maharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला ‘या’ व्यक्तीवरही शाश्वती नाही )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -