‘मिस्टर पोपटलाल’ तुम्हाला लवकरच कायदेशीर नोटीस येईल; संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

‘मिस्टर पोपटलाल’ तुम्हाला लवकरच कायदेशीर नोटीस येईल; संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

Sanjay Raut on Kirit Somaiya | मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची अनेक प्रकरणे बाहेर काढली आहेत. तसेच, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवरही ते सातत्याने निशाणा साधत असतात. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. मिस्टर पोपटलाल असा त्यांचा उल्लेख करत त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचं ट्वटी राऊतांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, “किरीट सोमय्या उर्फ भाजपाचे पोपटलाल माझ्याविरोधात तथ्यहिन आरोप करत असून शिवसेना नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. मी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली असून मिस्टर पोपटलाल यांना लवकरच कायदेशीर नोटीस बजावणार आहे. सत्याचा लवकरच विजय होईल, जय महाराष्ट्र!”


संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्यांवर १०० कोटींच्या शौचालयाचा आरोप केला होता. यावरून किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर अब्रुनुकसानाची दावा ठोकला आहे. याप्रकरणी शिवडी सत्र न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. मात्र, शौचालय घोटाळ्यात किरीट सोमय्यांना आता क्लीनचिट मिळाली आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी अनिल परबांनाही टार्गेट केलं आहे. दापोलीतील रिसॉर्टप्रकरण सोमय्यांनी उचलून धरलंय. या रिसॉर्टला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं असून येत्या काळात अनिल परबांवरही कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिलाय.

तसंच, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा एसआरए घोटाळा, अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंचा मार्वेतील स्टुडिओ, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरही किरीट सोमय्या सातत्याने टीका करत असतात. त्यामुळे संजय राऊत आता किरीट सोमय्यांविरोधात थेट कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – Kirit Somaiya : नवीन वर्षात या ‘पाच’ नेत्यांवर असणार किरीट सोमय्यांची वक्रदृष्टी

First Published on: January 24, 2023 12:26 PM
Exit mobile version