Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई Kirit Somaiya : नवीन वर्षात या 'पाच' नेत्यांवर असणार किरीट सोमय्यांची वक्रदृष्टी

Kirit Somaiya : नवीन वर्षात या ‘पाच’ नेत्यांवर असणार किरीट सोमय्यांची वक्रदृष्टी

Subscribe

नववर्ष सुरू होण्यास काही तासच उरलेले असताना भाजप नेते किरिट सोमय्या यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची भविष्यवाणीच केली आहे.

नववर्ष सुरू होण्यास काही तासच उरलेले असताना भाजप नेते किरिट सोमय्या यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची भविष्यवाणीच केली आहे. सोमय्या यांनी एक टि्वट केले आहे. या टि्वटमध्ये नव वर्षात मविआमधील कोणत्या नेत्यांवर त्यांची वक्रदृष्टी असेल त्यांची नावच सोमय्यांनी जाहीर केली आहेत. यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्या या नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

या टि्वटमध्ये सोमय्या यांनी नवीन वर्षात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील ५ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय, तसेच दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील अनिल परब, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांचा समावेश आहे. यात ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले.अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट, ४९ स्टुडीओप्रकरणी अस्लम शेख, मुश्रीफ आणि किशोरी पेडणेकर यांचा पालिका घोटाळा आणि SRA घोटाळ्यातील पाळमूळ खोदून काढण्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -