योगी-भागी संदर्भातील मतपरिवर्तन संशोधनाचा विषय, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

योगी-भागी संदर्भातील मतपरिवर्तन संशोधनाचा विषय, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

ज्या भाजपसोबत तुम्ही आता आहात त्यांचं पहिलं सरकार आणण्यासाठीही समाजवादीनेच पाठिंबा दिला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी अभ्यास करावा, मग बोलावं, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी सरकाचे कौतुक केलं आहे. भोंगे हटवल्याच्या कामाचे राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे. परंतु योगी आणि भोगी कोण हा संशोधनाचा विषय आहे. तसेच याबाबत मतपरिवर्तन कसं झालं यावर पीएचडी करता येईल अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात यावे ही सरकारची भूमिका आहे. तर खासदार भावना गवळींबाबत राऊत म्हणाले की, एकाच पक्षातील प्रमुख नेत्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु काही झाले तरी महाविकास आघाडीतील लोकं लढा देतील.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आले नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे पालन करण्यात आले आहे. ते करण्यात आले आहे. असेच महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार नेहमी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असते. भोंग्यांच्या विषयाकडे राजकीय दृष्ट्या तापवण्यचा प्रयत्न सुरु आहे. योगी कोण आणि भोगी कोण? योगी भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पीएचडी करायची असेल तर त्याने केली पाहिजे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

सामानामध्ये पंतप्रधानांवर निशाणा नाही

पंतप्रधान यांच्यावर लक्ष करण्यात आले असे म्हणता येणार नाही. स्पष्ट भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह बिगर भाजपशासित राज्यांवर जी टीका टिप्पणी केली. पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नव्हती. ते एका पक्षाचे नसतात तर ते सगळ्या राज्यांचे असतात. ज्या राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता नाही त्या राज्यात अधिक संवेदनशील राहावे लागते यालाच लोकशाही म्हणतो. बिगर भाजपशासित राज्यांना सावत्र भावाची वागणूक मिळते, या राज्यांची आर्थिक कोंडी करण्यात येते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी विरोधात भूमिका मांडत असतात.

शरद पवारांच्या भूमिकेचे स्वागत

शरद पवारांची भूमिका राष्ट्रव्यापी आहे. या देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा ज्या प्रकारे गैरवापर सुरु आहे. त्याप्रमाणे देशद्रोही हे जे कलम आहे. त्याचे मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. भीमा कोरेगाव दंगलीनंतर ज्या काही लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याबाबत चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातही तसेच प्रकरण आहे. भीमा कोरेगावमध्ये या कायद्याचा वापर करण्यात आला आहे. त्यावेळी आमचे सरकार नव्हते. या प्रकरणात मोठे लेख, विचारवंत, डॉक्टर, वकील यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरु आहे.

किरीट सोमय्या आयएनएस घोटाळ्यातील आरोपी

एक गुन्हेगार आहे जो विक्रांत घोटाळ्यातून बाहेर सुटला आहे. दिलासा घोटाळ्याचे ते लाभार्थी आहेत. अशा गुन्हेगारांकडे काय लक्ष देताय, ज्यांनी पैशाचा अपहार केला आहे. देशाचा पैसा आयएनएस विक्रांत वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. ते तुरुंगात असायला पाहिजे होता परंतु न्यायव्यवस्थेत दिलासा घोटाळा सुरु आहे. त्याचे ते लाभार्थी आहेत. त्यामुळे ते याच्या त्याच्यावर याचिका दाखल करत आहेत.


हेही वाचा : Bhavana Gawali : भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स, चौकशीला न आल्यास ED कारवाई करणार

First Published on: April 29, 2022 11:07 AM
Exit mobile version