‘त्या’ विधानानंतर राज्य सरकारमध्ये सर्व आलबेल, राऊतांचे मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर वक्तव्य

‘त्या’ विधानानंतर राज्य सरकारमध्ये सर्व आलबेल, राऊतांचे मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादर दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात आजी-माजी एकत्र आल्यावर भावी सहकारी होतील असे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर राज्य सरकारमध्ये सर्वत्र शांतता आहे. सर्व आलबेल असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी दर्शवली असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांशी मी नेहमी संपर्कात असतो अशी काही नाराजी नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर संजय राऊत यांनी राजकीय चर्चा केली असल्याची माहितीही दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत काही राजकीय गप्पा मारल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल आहे. सर्वत्र शांतता आहे. कोणतंही वादळ नाही कमालीची शांतता आहे. महाविकास आघाडी सरकार यशस्वी ३ वर्ष चालणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणीवपुर्वक विधान केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले आहे की, जे माजी आहेत त्यांना भावी व्हायचे आहे. यासाठी भाजपमधील काही नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर वक्तव्य केलं आहे. ते मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन सांगतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हाणाले ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थित होते. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताना व्यासपीठावर उपस्थिती भाजप नेत्यांकडे पाहून म्हटलं आहे की, जर आजी माजी एकत्र आले तर भावी सहकारी होतील. मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांकडे पाहून म्हटलं असल्यामुळे भाजपला खुली ऑफर दिली असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचे विधान मुंबईतील दुर्घटनेवरुन लक्ष विचलित करण्यासाठी, नितेश राणेंचा आरोप


 

First Published on: September 18, 2021 2:48 PM
Exit mobile version