सहा वर्षांनी थप्पड ऐकायला आली का? आदित्यनाथांबद्दलच्या वक्तव्यावर राऊतांचा सवाल

सहा वर्षांनी थप्पड ऐकायला आली का? आदित्यनाथांबद्दलच्या वक्तव्यावर राऊतांचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी अपशब्द काढले होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपने तक्रार दाखल केल्या आहेत. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य करुन आता सहा वर्षे झाली आहेत. सहा वर्षांनी तुम्हाला थप्पड ऐकायला आली का? असा सवाल राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत भाजप आणि राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयीच्या विधानाला सह वर्षे पूर्ण झाली आहेत. तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हा ते विधान आक्षेपार्ह वाटलं नव्हतं का? सहा वर्षांनी थप्पड ऐकायला आली का? असा सवाल राऊत यांनी केला.

शिवाजी महाराजांच्या अपमान केल्यानं मुख्यमंत्री तसं म्हणाले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं. भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे. आम्हाला नाही चांगलं वाटलं म्हणून आम्ही त्यावर बोललो. या महाराष्ट्रात काय या देशात चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे. भाजपमध्ये जे लोक नवे गेले आहे त्यांना तसं वाटत असेल तर ठिक आहे, तसं त्यांनी जाहीर करावं, अशा शब्दात भाजपचा समाचार घेतला.

अनिल परब यांची पाठराखण

परिवहन मं६ी अनिल परब यांनी पोलिसांवर अटकेसाठी दबाव टाकल्याचा ारोप भाजपने केला आहे. यासंदर्भात भाजप चौकशीची मागणी करत आहेत. यावर प्रतक्रिया देताना संजय राऊत यांनी अनिल परब यांची पाठराखण केली आहे. ज्यांना गुन्हा दाखल करायाच आहे त्यांनी दाखल करावा. भाजप काहीही करु शकतं. ते परग्रहावर देखील गुन्हा दाखल करु शकतात, अशी टीका राऊत यांनी केली.

First Published on: August 26, 2021 12:46 PM
Exit mobile version