तपास यंत्रणांसमोर शरद पवार आणि महाविकास आघाडीचे इतर नेते टार्गेटवर, संजय राऊतांचा आरोप

तपास यंत्रणांसमोर शरद पवार आणि महाविकास आघाडीचे इतर नेते टार्गेटवर, संजय राऊतांचा आरोप

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तसेच त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीचे इतर नेते टार्गेटवर असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत अधिक सुडबुद्धीने आणि बदल्यांच्या भावनेने वागत आहेत. त्यांना टार्गेट दिलेले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

तपास यंत्रणांसमोर शरद पवार टार्गेटवर

केंद्रीय तपास यंत्रणा या महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत अधिक सुडबुद्धीने आणि बदल्यांच्या भावनेने वागत आहेत. त्यांना टार्गेट दिलेले आहेत. त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. पूर्वी या देशात असं कधीही घडलं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुढील टार्गेट असून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण येथे दाऊदचा संबंध जोडला जातोय. काल सारख्या पक्षात आलेली लोकं हे शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तींवरती ज्या भाषेत बोलत आहेत. हे फडणवीसांना मान्य आहे का, असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

लोकांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन काम करणं हे लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने मागील सात ते आठ वर्षांपासून हे चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे जणू जन्माचे शत्रू आहेत. हे चित्र देशाच्या संसदीय लोकशाहीसाठी चांगलं नाहीये. राष्ट्राच्या, सुरक्षेच्या आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर जास्तीत जास्त एकमत करून सभागृहाचं कामकाज पुढे नेणार आहोत, असं राऊत म्हणाले.

चार राज्यातल्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत. त्यामध्ये एका राज्यात आप पक्षाने मुसंडी मारलेली आहे. या विजयाचा अजिर्ण होऊ नये आणि हा विजय सत्काराने लावावा, एवढचं आम्ही म्हणू शकतो. कारण या देशामध्ये विरोधी पक्ष राहणं या देशाची आणि लोकशाहीची गरज आहे.

नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व देशामध्ये सर्वात उंच

देशाचे पंतप्रधान हे एका देशाचे नसतात. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व देशामध्ये सर्वात उंच आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना असं वाटतंय की, ते फक्त आमच्याच पक्षाचे पंतप्रधान आहेत. अशा प्रकारचं वातावरण त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी निर्माण केलंय आणि करत आहेत. मोदींची गेल्या काळातील काही भाषणं पाहिली असता मोदींनी सुद्धा या पक्षातून बाहेर पडलं पाहीजे, असा सल्ला राऊतांनी मोदींनी दिला. तसेच यामध्ये सर्वाधिक समावेश महाराष्ट्रातील नेत्यांचा आहे. काही लोकांना मोठेपण मिळालं असेल तर ते त्यांना टिकवता येत नाही आणि प्रतिष्ठाही वाढवता येत नाही. असं राऊत म्हणाले.

गोव्याचं नेतृत्व काय ?

गोव्यातील निवडणुका एखाद्या पक्षाने जिंकल्या, तर त्याचा टेंबा कुणीही मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कुणाच्याही हातात राहत नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोव्याचे शिल्पकार आहेत. तसेच त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मोठं स्वागत झालं. आम्हाला देखील आनंद झाला. परंतु गोवा कुणालाही जिंकता येत नाही. गोव्यामध्ये कधीही पक्ष जिंकत नाही तर फक्त व्यक्ती जिंकते. गोव्यामध्ये पक्षा व्यतिरिक्त त्या भागातील व्यक्तीचं महत्त्व अधिक असतं, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : Maharashtra Budget Session 2022 Live Update : फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बवर गृहमंत्री वळसे पाटील उत्तर देणार


 

First Published on: March 14, 2022 10:29 AM
Exit mobile version