घरअर्थसंकल्प २०२२Maharashtra Budget Session 2022 Live Update : सत्ताधारी पक्षाच्या गैरहजेरी मुळे विधान...

Maharashtra Budget Session 2022 Live Update : सत्ताधारी पक्षाच्या गैरहजेरी मुळे विधान परिषदेचे कामकाज तहकूब

Subscribe

सत्ताधारी पक्षाच्या गैरहजेरी मुळे विधान परिषदेचे कामकाज तहकूब


पेनड्राईव्ह बॉम्बची चौकशी सीबीआयला देण्याच्या मागणीवरुन विरोधकांचा सभात्याग – फडणवीस

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बची चौकशी होणार-फडणवीस


दुसऱ्या टप्प्यात आणखी ७ हजार २३१ पोलिसांची भरती करण्यात येणार – गृहमंत्री

- Advertisement -

पेपरफुटीमध्ये राज्यातील पोलिसांनी अतिशय कडक भूमिका घेतली आहे. कारण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणालाही खेळता येणार नाही. यामध्ये आतापर्यंत २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे – गृहमंत्री

म्हाडा पेपर फुटी प्रकरणात ६ आरोपींना अटक – गृहमंत्री


फडणवीसांचा विधानसभेत दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब

विधानसभा अध्यक्षांना देवेंद्र फडणवीसांनी दिला पेन ड्राईव्ह

विधानसभेत फडणवीसांचा दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब

दाऊदशी संबंधित असलेले आणखी एक प्रकरण बाहेर


मेट्रो ही आता अहंकारामुळे बंद आहे. किमान पाच वर्ष ही मेट्रो सुरू होणार नाही, अशी स्थिती आहे. पण सरकारने आतातरी धोरण बदलावे. जनतेचा असा छळ करू नका: देवेंद्र फडणवीस
नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा विचार आम्ही केला होता. केवळ 33 टक्के भूसंपादन करावे लागेल.
ते करावे, ही आमची मागणी आहे: देवेंद्र फडणवीस

वेश्यासाठीच्या निधीत भ्रष्टाचार.
संजय राऊत जो शब्द वापरतात, तो येथे मी वापरू शकत नाही.
पूर्ण माहिती घ्या.
वेश्यांसाठीचा पैसा खात असाल तर तुम्ही कुठे चालला आहात, याचा विचार करा : देवेंद्र फडणवीस


पण आज देशाच्या कुपोषणात महाराष्ट्रात प्रमाण 19 टक्के : देवेंद्र फडणवीस 


विविध अत्यावश्यक सेवांसाठी आरोग्य विभागाची मागणी : 835 कोटी
– मंजूर निधी : 508 कोटी आणि प्रत्यक्षात दिले केवळ : 263 कोटी

– आरोग्य विभागाने वीजबिल, पाणी, दूरध्वनीसाठी मागितले : 63 कोटी
– मंजूर निधी : 38 कोटी आणि प्रत्यक्ष दिले केवळ 31 कोटी : देवेंद्र फडणवीस


आजही अवस्था अशी आहे की, १८ लाख ५२ हजार शेतकरी कर्जामध्ये आहेत.

घोषणांमध्ये आपण नापास झाले आहात, फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

आमच्या काळात जे जे जमीनीचे हस्तांतर केले त्यामध्ये मोबदला दिला आहे.

आता या दोन वर्षात केवळ ३ हजार ९८१ कोटी मिळाले आहेत. मदत आणि सरासरी कमी झाली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा कर्जात १४ हजार ४०० कोटी आमच्या काळात मिळाले


संभाजी महाराजांचे स्मारक आपण करत आहोत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी आग्रही असणारे आता का शांत आहेत – फडणवीस

दोन ओळीचा ठराव मंत्रिमंडळात आणायचा आहे. तो का येत नाही?

पाऊस चांगला होऊनही कृषी उत्पादनात घट   2021 मध्ये सरासरी पावसाच्या 118.2 टक्के पाऊस   असे असतानाही 2021-22 च्या खरीप हंगामामध्ये तृणधान्ये, कडधान्ये, तेलिबया, कापूस व ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे 11 टक्के, 27 टक्के, 13 टक्के, 30 टक्के व 0.4 टक्के घट अपेक्षित


आम्ही अहवाल केला नसता तर ही बैलगाडा शर्यत कधीच सुरु झाली नसती – फडणवीस

संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केली त्याबाबत अभिनंदन

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयासाठी १२ कोटी तरतूद केली परंतु एक नवा पैसा दिला नाही – देवेंद्र फडणवीस


कोणाला किती निधी

३ लाख १४ हजार ८२० – काँग्रेस
१ लाख ४४ हजार १९३ कोटी – राष्ट्रवादी
९० हजार १८१ कोटी म्हणजे १६ टक्के – शिवसेना


विकासाची पंचसूत्री जुन्या योजनांचे पॅकेज – देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प आणि दिसणारा अर्थसंकल्प पूर्णपणे वेगळा असल्याचे देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

हा अर्थसंकल्प पाहिला तर जास्तीत जास्त योजना केंद्र सरकारच्या आहेत. रोज केंद्राला नावे ठेवतो, सगळीकडे राज्याच्या कामगिरीबाबत सांगताना केंद्रीय योजनांचा फायदा घेतला आहे. – देवेंद्र फडणवीस


खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारची अवस्था या अर्थसंकल्पाची झाली आहे. देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

अर्थसंकल्प आणि खर्चाचा ताळमेळ नाही – देवेंद्र फडणवीस


अर्थसंकल्पावरील ७ दिवसांची सर्व साधारण चर्चा स्थगित करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवारांनी सभागृहात मांडला


द कश्मिर फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा – आमदार मंगल प्रभात लोढा


विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दटके यांनी द कश्मिर फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली.
तसेच चित्रपटात अडथळा निर्माण करणार्‍यांविरोधात संरक्षण द्यावे. तसेच कारवाईची मागणीही त्यांनी केली.


फडणवीसांच्या नोटिशीवरुन विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला


फडणवीस यांना कोणत्याही राजकीय हेतूने नोटीस पाठवण्याची आली नव्हती – गृहराज्यमंत्री

कोणत्याही प्रकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न नव्हता. संवेदनशील माहिती बाहेर जाऊ नये यासाठीच ही नोटीस बजावली होती. विधान सभेत मांडलेली माहिती त्यांच्याकडून अपेक्षित असल्याने मुंबई सायबर पोलिसांनी नोटीस बजावली होती.


गडचिरोली नक्षलवाद्यांची एकनाथ शिंदे यांना धमकी प्रकरण
एकनाथ शिंदे कुटुंबातील व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेणार. प्रसंगी अतिरिक्त पोलीस सुरक्षा देणार
– शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्री


केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर ६ गुन्हे दाखल – शंभूराजे देसाई

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर ६ गुन्हे दाखल असल्याची गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची विधान परिषदेत माहिती


गोपिचंद पडळकर यांच्यावर ३२ गुन्हे. त्यापैकी ८ ते ९ गुन्हे गंभीर दाखल असल्याची गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची विधान परिषदेत माहिती


विधानसभा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात


केमिस्ट्री पेपर फुटला नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण


फडणवीसांना पाठवलेल्या नोटीसीवर स्थगन प्रस्ताव आणणार – चंद्रकांत पाटील


शनिवारी १२ वी केमिस्ट्रीचा पेपर फुटला – निरंजन डावखरे
विलेपार्ले येथे कारवाई झाली – वर्षा गायकवाड


विधान परिषद सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात


नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणा


टीईटी परीक्षा घोटाळा लक्ष्यवेधी
विरोधी पक्षाच्या सभागृहातील गैरहजेरी मुळे सभागृहाचे कामकाज १०.४५ स्थगित


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील फडणवीसांच्या आरोपांवर उत्तर देणार


राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यामुळे विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा आंदोलन करणार

राज्यातील अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार?


Maharashtra Budget Session 2022 Live Update : फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बवर गृहमंत्री वळसे पाटील उत्तर देणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -