आम्ही पण बघून घेऊ, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीवर राऊतांचे विधान

आम्ही पण बघून घेऊ, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीवर राऊतांचे विधान

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर तपास यंत्रणांची चौकशी सुरु राजकीय सुडापोटी होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीद्वारे कारवाई करण्यात येत आहे. देशमुखांच्या स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली असून देशमुखांना ईडीने समन्स बजावले आहेत. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणांमार्फत सर्वांनाच त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे परंतु आम्ही बघुन घेऊ असं स्पष्ट विधान संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, बघावं लागेल कालच अनिल देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली. शरद पवार यांन काल सांगितले की, नैराशेतून हे करण्यात आले आहे. काही लोकांच्या मनात निराशा आहे. सरकार बनवू शकलो नाही या अपयशामुळे नैराश्य आलेलं आहे. शरद पवार अगदी बरोबर बोले आहेत. सरकारमध्ये असलेल्या पक्षातील लोकांना त्रास देण्यात येतोय. महाराष्ट्रातील तपास यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करु शकते पण महाराष्ट्रातील मंत्री असो की, शिवेसेने मंत्री आणि आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे परंतु आम्ही बघून घेऊ असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

काँग्रेसला घेऊनच आघाडी

संजय राऊत यांनी विरोधी पक्षांची मजबूत आघाडीबाबतही वक्तव्य केलं आहे. देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनवण्याची तयारी सुरु आहे. काँग्रेसला सोबत घेऊनच विरोधाकांची मजबूत फळी उभी राहू शकते. आम्ही देखील हेच बोललो होतो. दोन दिवसांपूर्वी सामना मध्ये आम्ही हेच बोललो होतो. या देशात विरोधकांची जी मजबूत फळी उभी करण्याचं काम सुरू आहे. काँग्रेस शिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाचे नेते दिनेश गुंडोराव यांनी देखील शिवसेनेच्या भूमिकेचा संदर्भ दिला आहे. या देशातील विरोधी पक्ष एकत्र आला तरच राजकीय पर्याय उभा राहू शकतो. देशातील विरोधक एकत्र आले तर अर्थात काँग्रेससह तर देशात सध्याच्या राजकीय व्यवस्थेत चांगला पर्याय उभा राहू शकतो असे विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

First Published on: June 26, 2021 12:27 PM
Exit mobile version