सर्वसामान्य शिवसैनिक आज आनंदी, ईडी छाप्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

सर्वसामान्य शिवसैनिक आज आनंदी, ईडी छाप्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

संजय शिरसाट

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक काही वेळापूर्वीच संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झाले आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊतांनी चौकशीला जाणे टाळले होते. दरम्यान संजय राऊतांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आमदार संजय शिरसाट –

यावेळी ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, त्या राऊतांच्या घरावर छापा पडल्यानं आम्ही आनंदी आहोत. सर्वसामान्य शिवसैनिकालादेखील आज आनंदा झाला असेल,असे संजय शिरसाट म्हणाले. पुढे संजय राऊत अतिशय हुशार नेते आहेत. त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. ते ईडीलादेखील घाबरत नाहीत. त्यांना स्वत:बद्दल इतका आत्मविश्वास असेल, तर मग घाबरायचं कारण नाही, असेही शिरसाट म्हणाले

खोतकर यांचा विषय वेगळा – संजय शिरसाट 

शिवसेनेचे नेते आणि जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी शनिवारी शिंदे गटात प्रवेश केला. आपण उद्धव ठाकरेंना अडचण सांगितली होती, असे खोतकर पत्रकार परिषदेत म्हणाले. तुम्ही अडचणीत असाल तर जा, असे ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचेही खोतकर म्हणाले. खोतकर यांच्यामागे सध्या ईडीचा ससेमिरा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिरसाट राऊत तुमच्या गटात आले तर पवित्र होतील का, असा प्रश्न शिरसाट यांना विचारण्यात आला. त्यावर खोतकर यांचा विषय वेगळा आहे. काल त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला, असे शिरसाट म्हणाले.

First Published on: July 31, 2022 10:17 AM
Exit mobile version