श्रेयवादावरून निवडणुकांपूर्वीच राष्ट्रवादीत गटा तटाचे राजकरण

श्रेयवादावरून निवडणुकांपूर्वीच राष्ट्रवादीत गटा तटाचे राजकरण

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माढा मतदार संघातील कार्यक्रमात श्रेयवादावरून वाद झाल्याची घटना घडली आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर हा वाद चव्हाट्यावर आला. शरद पवार यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते एकमेकांशीच भीडले. हा वाद शिगेला जाऊन शेवटी पोलिसांना त्यांची मध्यस्थी करावी लागली. या वादामुळे पवारांना आपले भाषण थांबवावे लागले. माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी सभेत गोंधळ घातला. आंतर्गत वादामुळे राष्ट्रवादीच्या कविता म्हेत्रे या स्टेजवर असल्याने स्टेजवर न जाण्याची भूमिका गोरे यांनी घेतली. या वादानंतर हा कार्यक्रम काही वेळ थांबवण्यात आला.

काय आहे प्रकरण

कार्यक्रमादरम्यान कविता म्हेत्रे यांनी भाषणास सुरुवात केली त्यावेळी शेखर गोरेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. “सर्व सांगा, खरं सांगा” अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या. भाषणादरम्यान झालेल्या गोंधळामुळे इतर कार्यकर्ते भडकले.  म्हेत्रे यांच्या समर्थकांनी गोरेंच्या समर्थकांना थांबवले. यामुळे वादाला तोंड फुटले आणि दोन्ही गटातील कार्यकर्ते भीडले.

“पवार साहेबांचा मी आदर करतो. आमचा वाद पवार साहेबांविरोधात नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्याबद्दल पक्षाने विचार करावा. माझा आवाज पवार साहेबांपर्यंत पोहचू देत नसल्यामुळे मी कार्यक्रमात बोललो.” – शेखर गोरे, स्थानिक नेते, राष्ट्रवादी

First Published on: February 22, 2019 1:41 PM
Exit mobile version