पुलावरुन मिनीबस ५० फूट खोल नदीत कोसळली; ५ जण ठार, ६ जण जखमी

पुलावरुन मिनीबस ५० फूट खोल नदीत कोसळली; ५ जण ठार, ६ जण जखमी

अपघात

वाशीवरुन गोव्याकडे फिरायला निघालेल्या मिनीबसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना सातारा जिल्ह्यात उंब्रजजवळ पुलावरुन तारळी नदीच्या पात्रात शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कोसळली आहे.

दिवाळीच्या सुट्टीची मज्जा लुटण्यासाठी वाशीवरुन संबंधित अपघातग्रस्त मिनीबसमधून गोव्याला फिरायला निघाले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास मिनीबस पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरापासून ३४ किलोमीटर अंतरावर उंब्रजजवळ पोहोचली. त्याचवेळी चालकाचा ताबा सुटून ही बस तारळी नदीवरील दोन पुलांच्या मधून जवळपास ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली आणि जखमींच्या किंकाळ्यांनी उंब्रजकरांच्या छातीत धस्स झाले. हा अपघात इतका भीषण होता. की क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अनेकांनी अपघातस्थळी धाव घेत पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरु केले.


हेही वाचा – सोलापूर-पुणे राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात; ३ जण ठार, १० जण जखमी


 

First Published on: November 14, 2020 12:48 PM
Exit mobile version