पोलिसांसमोरच दोघांनी एकमेकांवर केला धारदार कोयत्याने हल्ला!

पोलिसांसमोरच दोघांनी एकमेकांवर केला धारदार कोयत्याने हल्ला!

प्रातिनिधीक फोटो

साताऱ्या तालुक्यात धारदार कोयत्याने एकमेकांवर वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे दोघे सातारा तालुका पोलीस स्टेशन समोरच भिडले असून ही घटना थरकाप उडवणारी होती. हा हल्ला पोलिसांच्या समोर झाला असून यामधे दोघेही गंभीर जखमी झाले तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

असा घडला प्रकार

गुरूवारी, सकाळी ११ वाजता सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या समोर ही धक्कादायक घटना घडली असून या दोघांमध्ये जुना वाद होता, त्याकरता ते पोलीस ठाण्यात आले होते. मात्र तेथे आल्यानंतर या दोघांमध्ये हा हल्ला झाला.

साताऱ्यातील सैदापूर येथे राहणाऱ्या सुरेश दुबळे आणि रामा दुबळे यांच्यात गावी वाद झाला होता. त्यातून ते गुरुवारी सकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर सुरेश दुबळे याने आणलेल्या कोयत्याने रामा दुबळे याच्यावर वार केला.

सुरेशने अचानक केलेल्या हल्लामुळे एकच पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली. दोघांमध्ये झटापट झाली आणि रामाने सुरेशच्या हातातून कोयत्या हिसकवला आणि त्याच धारधार रामाने सुरेश याच्यावर वार करून हल्ला केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


सुरक्षा कर्मचार्‍यांने ४० विद्यार्थ्यांसह, शिक्षकांवर केला चाकूने हल्ला; तिघं गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यात हल्ला झाल्याने पोलिसांची धावपळ झाली. दोघांमध्ये हल्ला झाल्यानंतर दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांनाही शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही धक्कादायक घटना कळताच सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी दाखल होत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली असून या प्रकरणी पोलीस अधिकांचा तपास सुरू आहे.

First Published on: June 4, 2020 6:50 PM
Exit mobile version