धक्कादायक! शाळेत सापडला कंडोमचा दोन पोती कचरा

धक्कादायक! शाळेत सापडला कंडोमचा दोन पोती कचरा

शाळेत सापडला कंडोमचा दोन पोती कचरा

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबाजोगाई येथील मंडी बाजार भागात असलेल्या मुलींच्या जिल्हा परिषदेच्या शाळात दारुच्या बाटल्यांसह दोन पोती कंडोमचा कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे. टारगट मुलांनी किंवा तळीरामांनी हा उपद्रव केला असावा, अशी शक्यता मुख्यध्यापक हनुमंत कदम यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आता याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

उन्हाळी सुट्टीनंतर १७ जून रोजी शाळांची पहिली घंटा वाजली. ४५ दिवसांच्या सुट्टीनंतर मंडी बाजार भागातील मुलींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची आणि आजूजाबूच्या परिसरातील शिक्षकांनी स्वच्छता केली. या स्वच्छते दरम्यान, शिक्षकांना भयानक असा कचरा आढळून आला. ज्यामुळे शिक्षकांना धक्का तर बसलाच मात्र त्यांचा संताप देखील झाला. शिक्षकांना कचऱ्यामध्ये दारुच्या बाटल्यांसह दोन पोती कंडोम कचऱ्यात आढळून आले आहे. शाळेच्या परिसरात अशा प्रकारचा कचरा आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

हा कचरा कसा आढळला

अंबाजोगाई येथील मंडी बाजार भागात असलेल्या मुलींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला सुरक्षा भिंत आहे. मात्र, तिची उंची कमी आसल्याने त्यावर चढून किंवा बाहेरुन हा कचरा फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तसेच या शाळेजवळच भाजीमंडई आणि इतर गजबजलेला परिसर असून हा बाजार रात्री मोकळा असतो. त्यामुळे या परिसरात हा कचरा तळीरामांनी आणून फेकला असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आला आहे.


हेही वाचा – माहिती अधिकाराच्या उत्तरात मिळाले वापरलेले कंडोम!

हेही वाचा – वापरलेले निरोध मिळाले तर दंड; मद्रास IIT वसतिगृहाचे पत्रक


 

First Published on: June 18, 2019 1:37 PM
Exit mobile version