घरदेश-विदेशवापरलेले निरोध मिळाले तर दंड; मद्रास IIT वसतिगृहाचे पत्रक

वापरलेले निरोध मिळाले तर दंड; मद्रास IIT वसतिगृहाचे पत्रक

Subscribe

मद्रासमधील आयआयटी ही संस्था देशातील नावाजलेल्या संस्थापैकी एक मानली जाते. मात्र या संस्थेतील वसतिगृहातील नोटीस बोर्डवर लावलेल्या एका तक्त्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. जर वापरलेले निरोध खोलीतल्या कचरा डब्यात आढळले तर पाच हजारांचा दंड आकारला जाईल, अशी ताकिद देणारे पत्रच नोटीस बोर्डवर लावण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी मात्र चांगलेच चिडले आहेत. हा आमच्या खासगी आयुष्य आणि प्रतिष्ठेवर हल्ला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

आयआयटी मद्रासच्या ब्रम्हपुत्रा या मुलांच्या वसतिगृहात दक्षता विभागाने मागच्या आठवड्यात धाड टाकली होती. यावेळी त्यांना मुलांच्या खोलीत बंदी असलेले साहित्य आढळून आले. अंडी उकडवण्याचे यंत्र, इलेक्ट्रिक चहाची केटली, पाणी थंड करण्याची मशीन, मिनी फ्रिज, पाणी गरम करण्याचा बंब अशा गोष्टी आढळून आल्या. मात्र एका खोलीत जे साहित्य सापडले ते पाहून दक्षता पथकातील अधिकाऱ्यांची भंबेरीच उडाली. एका विद्यार्थ्याच्या खोलीतील डस्ट बीनमध्ये २० सिगारेट्सचे थोटके, माचीस आणि वापरलेले कंडोम आढळून आले आहेत.

- Advertisement -
‘2.0’ ची कमाई वाढता वाढता वाढे…

वसतिगृह कार्यालयाने नोटीस बोर्डवरच या प्रकरणाची वाच्यता केली. तसेच ज्या विद्यार्थ्याच्या खोलीत हे साहित्य मिळाले, त्याचे नाव लिहून त्यापुढे पाच हजार दंड भरावा, असे सांगितले. यामुळे विद्यार्थ्याची नाचक्की झाली असल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. दक्षता पथकातील अधिकारी आमच्या खोल्यात जबरदस्ती घुसले आणि आमच्या समंतीशिवाय त्यांनी फोटो काढले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच आयआयटी मद्रासच्या इतर महिला विद्यार्थ्यांनी सांगितले की, कॉलेज कॅम्पसमध्ये नैतिकतेचा आव आणत आमचा प्रचंड छळ केला जात आहे, असा आरोप केला आहे.

गतवर्षी आयआयटी कँम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये काही धक्कादायक तथ्य समोर आली आहेत. एका दक्षता अधिकाऱ्याने विद्यार्थीनीला प्रश्न विचारला की, “मुलांच्या खोलीत गेल्यानंतर तिथला बेड व्यवस्थित होता का?” त्याच्या या प्रश्नामुळे आपल्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याचे त्या विद्यार्थीनीने या सर्वेक्षणात सांगितले होते.

- Advertisement -

 

मात्र वसतिगृह प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही विद्यार्थ्यांची कोणतीही माहिती उघड करत नाहीत किंवा नोटीस बोर्डवर ती लावत नाहीत. तसेच या प्रकरणाची आम्ही पुर्ण चौकशी करु, असे वसतिगृह प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -