घरदेश-विदेशमाहिती अधिकाराच्या उत्तरात मिळाले वापरलेले कंडोम!

माहिती अधिकाराच्या उत्तरात मिळाले वापरलेले कंडोम!

Subscribe

राजस्थानमध्ये माहिती कार्यकर्त्यांसोबत अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे. या कार्यकर्त्यांनी २००१ पासून करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती मागवली होती. त्यांना याच्या उत्तरात वापरलेल्या कंडोमचे दोन पाकिटे मिळाली आहेत.

माहितीचा अधिकार या काद्याच्या सहाय्याने कोट्यावधी रुपयांचे घोटाळे उघड झाले आहेत. माहितीचा अधिकार हा कायदा लोकशाहीच्या प्रमुख घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतु, सध्या या अधिकारातून दाखल केलेल्या अर्जाला उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात, अशी टीका आरटीआय कार्यकर्त्यांकडून केली जात होती. मात्र, आता याहीपलिकडे जाऊन प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे दर्शन झाले आहे. राजस्थानच्या एका तहसील कार्यालयाने माहितीच्या अधिकाऱ्यातील प्रश्नाला उत्तर म्हणून दोन पाकिटे पाठवले आहेत. या पाकिटांमध्ये वापरलेले कंडोम आढळले आहेत.

हेही वाचा – ठाण्यातील वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर!

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

राजस्थानमध्ये विकास चौधरी आणि मनोहर लाल या आरटीआय कार्यकर्त्यांनी १६ एप्रिल रोजी एक आरटीआय दाखल केला होता. यामध्ये त्यांनी २००१ सालापासून करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती मागवली होती. या आरटीआयच्या उत्तरात त्यांना दोन पाकिटे मिळाली. यातील पहिले पाकिट उघडले असता, यामध्ये त्यांना वापरलेले कंडोम आढळले. हा प्रकार राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील भादरा तहसीलमध्ये घडला. दरम्यान, पहिल्या पाकिटमध्ये कंडोम आढळल्यानंतर विकास चौधरी आणि मनोहर लाल यांनी दूसरे पाकिट गटविकास अधिकारी यांच्यासमोर उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र, गटविकास अधिकाऱ्याने या गोष्टीला सहमती दिली नाही. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी हे पाकिट गावकऱ्यांसमोर उघडण्याचे ठरवले. हे पाकिट उघडण्यात आले तेव्हा कॅमेरामामध्ये चित्रीकरण करण्यात आले. गावकऱ्यांसमोर उघडलेल्या या पाकिटमध्येही वापरलेले कंडोम मिळाले, त्यामुळे सर्व गावकरी अवाक झाले. यावेळी मनोहरलाल यांनी सरकारी कार्यालयाच्या कामकाजांवर प्रश्न उपस्थित केले.

हेही वाचा – सुरक्षा अमित शाहांची, पण खर्च सामान्यांचा का? माहिती अधिकारात सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -