तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू

तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू

तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचं काल (गुरुवारी) रात्रीपासून तुळजाभवानी मंदिरासमोर आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजापूर मंदिर परिसरात कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. आंदोलकांसाठी उभारलेला मंडप काल (गुरुवारी) रात्री प्रशासनाने हटवला असून तुळजाभवानी मंदिर परिसरात रिकामा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी तुळजाभवानी मंदिर परिसरात पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. तसेच आदेशानुसार तुळजाभवानी मंदिराच्या ३०० मीटर परिसरात कोणालाही प्रवेश करता येणार नाही आहे.

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे बेमुदत ठिय्या आंदोलन तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू आहे. पण काल रात्री आंदोलकांसाठी उभारण्यात आलेला मंडप प्रशासनाने हटवला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या तुषार भोसले यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आले आहे. पण प्रशासनाच्या कारवाईनंतरही आंदोलन सुरुच ठेवणार, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे.

तुषार भोसले एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ‘साधू, संतांना त्रास देण्यासाठी प्रशासनाने मंडप काढला असला तरी आज सकाळी रणचंडी यज्ञ आणि आंदोलन करणार आहे. प्रशासनाच्या दबावाला बळी पडणार नाही. जोपर्यंत मंदिर उघडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार’, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आज सकाळपासून तुळजाभवानी मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.


हेही वाचा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीसाठीही राज्य सरकारकडून गाईडलाईन्स


 

First Published on: November 6, 2020 9:40 AM
Exit mobile version