संतापजनक! पोलिसाने अधिकारी महिला पोलीसाचा केला विनयभंग!

संतापजनक! पोलिसाने अधिकारी महिला पोलीसाचा केला विनयभंग!

मुंबईत पोलीस खात्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी  अश्लील वर्तन करणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलिसाने ७ जुलैला रात्री पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोनाच्या या कठीण काळात पोलीस कोरोना योध्दाची भुमिका बजावत आहेत. यामध्ये तर महिला पोलिसांची तर तारेवरची कसरत सुरू आहे. याच कोरोनाच्या काळात व्यस्त कामकाजात महिला पोलिस अधिकाऱ्याला फेसबुकच्या माध्यमातून ओळख करून यवतमाळ येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने महिला पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर अश्लील मेसेज पोलीस निरीक्षकाने त्या महिलेला पाठविले. त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकाऱ्याने वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. अधिक तपासासाठी गुन्हा डी.एन नगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली.


हे ही वाचा – मृतदेहांची अदलाबदल; मुस्लिम महिलेवर हिंदुनी केले अंत्यसंस्कार!


First Published on: July 8, 2020 10:36 PM
Exit mobile version