शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडलं, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडलं, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

सातारा : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) हिंदुत्वापासून तोडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी विविध विषयांवर भाष्य केले.

नरेंद्र पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षापासून दूर करण्याचे काम केले आहे. ते ऐवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वापासून तोडण्याचे काम शरद पवार यांनी केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख हे मराठा मुख्यमंत्री होते. त्यांच्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कट्टर मराठा असल्यामुळे तेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या बैठकीतून तोडगा काढणार
सारथी योजनेतून डेथ ऑफ रजिस्ट्रेशन करण्याची विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, आता विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाणार आहे. याशिवाय सारथी योजना गावागावांत पोचण्यासाठी योजनेत बदल केले जात असून सर्वसामान्य नागरिकांना दोन लाखांपर्यंत कर्ज महामंडळातून देण्यासाठी निर्णय घेतला आहे. यासाठी बँकांशी करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, परंतु अण्णासाहेब पाटील महामंडळातून राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वितरण करण्यास अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कऱ्हाड यांची भेट घेऊन त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांची बैठक बोलावून चर्चा करावी आणि तोडगा काढावा अशी विनंती करणार असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केले. त्यांनी असेही सांगितले की, शहर व ग्रामीण भागातील योजना विस्तारण्यासाठी योजनेची माहिती मराठीबरोबर इंग्रजी व हिंदी भाषेत दिली जाणार आहे, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.

शैक्षणिक कर्जाचा समावेश
अण्णासाहेब पाटील महामंडळातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्याची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सुरुवातीला देशांतर्गत कुठेही शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार आहे. पुढील दोन वर्षांनंतर परदेशातील शिक्षणासाठी कर्ज मिळण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मराठा विद्यार्थ्यांना वसतिगृह बांधण्यासाठी शासकीय जागांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात मराठा विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळणार आहे, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.

First Published on: April 30, 2023 3:13 PM
Exit mobile version