पुणे महापालिका काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात, दिवाळीनंतर घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे महापालिका काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात, दिवाळीनंतर घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप, मनसेनं कंबर कसली आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार स्वतः पुणे महापालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. पुणे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार अॅक्टिव मोडमध्ये आले आहेत. दिवाळीनंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकी घेत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. तर काही दिवसांपुर्वी निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांचीही बैठक घेतली होती. नेत्यांच्या कामाचा आणि पक्षाचा आढाव शरद पवार सातत्याने घेत असतात. आता पुणे महापालिका काबिज करण्यासाठी शरद पवार पक्षाची बैठक घेणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपची सत्ता उलथवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडे सध्या ९९ नगरसेवक असून हा सर्वाधिक आकडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ४४ नगरसेवक, काँग्रेस ९ नगरेसवक आणि शिवसेनेचे ९ नगरसेवक तर मनसेचे २ नगरसेवक आहेत.

मनसेकडून जोरदार तयारी

पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून सर्वात आधी तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकवेळा पुणे दौरा केला आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या असून मोर्चेबांधणीही राज ठाकरे यांनी केली आहे. पुणे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी मनसेकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत.


हेही वाचा : शाहरुख खानने भाजपात प्रवेश केल्यास ड्रग्जची पिठी साखर होईल, भुजबळांचा भाजपवर निशाणा


 

First Published on: October 24, 2021 3:53 PM
Exit mobile version