तुमच्या भावनांचा आदर करून १-२ दिवसांत निर्णय घेणार, शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद

तुमच्या भावनांचा आदर करून १-२ दिवसांत निर्णय घेणार, शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र, पवारांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी २ ते दिवसांचा काळ मागितला असला तरीही ते अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हट्ले जाते. दरम्यान, आज देखील शरद पवारांनी सकाळी वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर सेंटरमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच तुमच्या भावनांचा आदर करून १-२ दिवसांत निर्णय घेणार, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, तुमच्या भावनांचा मी आदर करतो. असे निर्णय घेताना सहकाऱ्यांशी चर्चा करणं आवश्यक असतं. परंतु मला खात्री होती की, मी चर्चा केली असता तर तुम्ही विरोध केला असता. तुम्हाला विश्वासात घेऊन मला निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मात्र, ती घेतली गेली नाही. त्यामागील हेतू काय होता, हे देखील मी तुम्हाला सांगितला, असं शरद पवार म्हणाले.

हा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक तुमचे सहकारी मित्र याठिकाणी आलेत. माझ्याशी त्यांना काहीतरी बोलायचं आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत त्यांच्यासोबत माझी बैठक होईल. ती बैठक पार पडल्यानंतर जी काही तुमची भावना आहे ती विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. तुमच्या भावनांचा आदर करून १ ते २ दिवसांत निर्णय घेणार, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष करावे, अशी मागणी शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले की, “मी महाराष्ट्रात काम करतोय, माझी दिल्लीत ओळख नाही, आणि दुसऱ्या राज्याशी माझा संपर्क देखील नाही. यामुळे लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या व्यक्तीने अध्यक्षपद भूषवावे”, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा : “राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी अध्यक्ष पद भूषवावे”, जयंत पाटालांची इच्छा


 

First Published on: May 4, 2023 3:26 PM
Exit mobile version