छत्रपती संभाजी नगरमधील हिंसाप्रकरणी शरद पवार म्हणाले…

छत्रपती संभाजी नगरमधील हिंसाप्रकरणी शरद पवार म्हणाले…

बुधवारी मध्यरात्री छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. जाळपोळही झाली. राम नवमी उत्सवाची तयारी सुरू असतानाच झालेल्या हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शहारातील चौका-चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंदु-मुस्लीम समुदायांमध्ये शांतता समितीच्या बैठका सुरु आहेत. या घटनेवर शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

शरद पवार हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी छत्रपती संभाजी नगरमधील हिंसाचार प्रकरणावर भाष्य केलंय. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यातली आताची परिस्थिती पाहाता चिंता वाटायला लागली आहे. संभाजीनगर आणि मलावणी परिसरात हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. या घटनांना धार्मिक स्वरुप आहे का? याबाबत चिंता वाटत आहे. या सगळ्या गोष्टीवर अधिक चर्चा होणं योग्य नाही. लवकरात लवकर परिस्थिती सामान्य कशी होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. टीका करण्याची संधी अनेकदा असते. परंतू धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेला प्रश्नाबाबत टीका करताना खबरदारी घ्यायला हवी, असं आवाहन यावेळी शरद पवारांनी केलंय.

हे ही वाचा: भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू- शरद पवार

हे ही वाचा: मविआ सभेपूर्वी पवार – गडकरींची भेटी; ‘हे’ आहे कारण

अशात आता झालेल्या या हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील घटनेबाबत अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. सोबतच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. हा हिंसाचार राजकीय होता की धार्मिक आणि दोन समुदायांमधील होता? असा सवाल विचारण्यात येत आहे.

दरम्यान, या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पोलीसांच्या बेजबाबदारपणामुळे हा हिंसाचार झाला का? हिंसाचाराच्या ठिकाणी पोलीस उशीरा पोहोचले का? वातावरण खराब होतं तर सुरक्षेसाठी काही उपाय का केले नाहीत? जर हिंसाचाराच्या ठिकाणी वेळेत पोहचले तर पोलिसांनी दंगेखोरांची धडपकड का केली नाही?

First Published on: April 1, 2023 7:27 PM
Exit mobile version