कितीही चौकशा लावा, आम्ही घाबरत नाही अन् यापुढे महाआघीडचं सरकार येणार – शरद पवार

कितीही चौकशा लावा, आम्ही घाबरत नाही अन् यापुढे महाआघीडचं सरकार येणार – शरद पवार

ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही, त्या राज्यात ईडी, सीबीआय सारख्या वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. पण त्यांनी कितीही चौकशा लावाव्यात, आम्ही घाबरणार नाही, असा इशारा देत पुढील सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे. ते महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. त्या ठिकाणी शरद पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्यात यापुढे महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल. तसंच सर्वजण एकत्रित लढले, तर पुढील सरकारही महाआघाडीचेच येईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसात, मग दोन महिन्यात नंतर एका वर्षात पडणार, असं भविष्य अनेकांनी वर्तवलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील अधूनमधून भविष्य वर्तवित असतात. ते ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगलं होईल, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

मग सर्वांचं विलिनीकरण करावं लागेल

एसटीचं विलिनीकरण केलं तर सर्वांच विलिनीकरण करावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. राज्य सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या शिवाय अन्य दे कर्मचारी असताता. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, एसटीचे कर्मचारी, हे थेट नाही पण राज्य सरकारशी संबंधीत आहेत. विलिनीकरण केलं तर सर्वांना करावं लागेल, असं शदर पवार म्हणाले.

 

First Published on: November 26, 2021 10:09 AM
Exit mobile version