शशिकांत शिंदेंनी मागितली पवारांची माफी, साताऱ्यात शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेकीची घटना

शशिकांत शिंदेंनी मागितली पवारांची माफी, साताऱ्यात शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेकीची घटना

शशिकांत शिंदेंनी मागितली पवारांची माफी, साताऱ्यात शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेकीची घटना

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव झाला. शिंदे यांच्या पराभवामुळे साताऱ्यातील शिंदे समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पंरतु या घटनेनंतर शशिकांत शिंदे यांनी स्वतः घडलेल्या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माफी मागितली आहे. शशिकांत शिंदे यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी १ मताने पराभव केला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली होती. सुरुवातीला दोन्ही राजेंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे दोन्ही राजेंमधील संघर्ष मिटला. मात्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवार होते.  पक्षातील बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी एक मताने त्यांचा पराभव केला आहे.

कार्यकर्त्यांनी संतापून केली दगडफेक

राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांनी शशिकांत शिंदे यांना मदत केली नाही असा समज शिंदेंच्या समर्थकांचा झाला आहे. त्यामुळे आपल्या नेत्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला असल्याचे कार्यकर्त्यांना वाटत आहे. कार्यकर्त्यांकडून याचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच घोषणाबाजी करण्यात आली. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

शशिकांत शिंदेंनी मागितली माफी

कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच शिंदे म्हणाले की, पराभव हा खिलाडू वृत्तीने मान्य करावा लागतो आणि तो मी मान्य केला आहे. त्यामध्ये निवडणुका असतात हार, जीत होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांनी सर्वांनी प्रयत्न केले परंतु १ मताने पराभूत झालो. हा पराभव आम्ही स्वीकारला असून पुन्हा कामाला लागणार असल्याचे शशिकांत शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक प्रयत्न केले. त्यामुळे काही गोष्टी या वेगळ्या घडल्या, गाफील राहिल्याचा फटका बसला असून कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो असे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पराभूत

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बड्या नेत्यांनाही झटका बसला आहे. पाटण सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पराभूत झाले आहेत. शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकर यांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई यांना ४४ मते मिळाली आहेत. तर पाटणकर यांना ५८ मते मिळाली आहेत. पाटणकर हे ७ मतांनी विजयी झाले आहेत. तसेच शशिकांत शिंदे यांना देखील ज्ञानदेव रांजणेंनी पराभूत केलं आहे.


हेही वाचा : ST Worker strike: परिवहन मंत्र्यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात


 

First Published on: November 23, 2021 1:51 PM
Exit mobile version