विधान परिषदेत शशिकांत शिंदेंनी उपस्थित केला सभापती निवडणुकीचा मुद्दा, मागितली माहिती

विधान परिषदेत शशिकांत शिंदेंनी उपस्थित केला सभापती निवडणुकीचा मुद्दा, मागितली माहिती

मुंबई – विधानपरिषदेत आज दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शशिकांत शिंदे यांनी सभापती पदाच्या निवडणूकी बाबतच्या माहितीची मागणी केली. याबाबत त्यांनी सरकारने आम्हाला माहिती गट नेत्यांची बैठक कधी होणार यांची माहिती द्यावी अशी मागणी केली. यावर सभापतींनी माहिती उपलब्ध करून देण्याचे निरदेश दिले

सभागृहाचे कामकाज आणि विधीमंडळाच्या कामकाजा बद्दलची बैठक सभापतींच्या दालनात झाली त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विविध पक्षाचे गटनेते उपस्थित होते. त्यावेळी आम्ही विधान परिषदेच्या सभापतींची जागा रिक्त असल्याने या सभापतींच्या रिक्त जागे संदर्भातला मधला निवडणूक कार्यक्रम कधी होणार याचा सभागृहात खुलासा करावा. सभापतीची निवडणूक कधी घेणार याबाबत चर्चा झाली त्यावेळी गटनेत्यांशी चर्चा करून आपल्याला अवगत करू अशे सांगीतले होते. अधिवेशन संपायला आले आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. या सभागृहाचा प्रतिनिधी म्हणून आपण सभापती निवडणूकीचा कार्यक्रम कधी घेणार याची आम्हाला सदस्य म्हणून माहिती मिळावी

भाई जगताप काय म्हणाले –

या ठिकाणी पहिल्या दिवशी शक्षीकांत शिंदे यांनी ही भूमीका मांडली होती. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी अश्वासन दिले होते. उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मला असे वाटते की प्रश्न तीथेच आहे. दुर्दैवाने लोकशाहीत घटनेच्या चौकटीत काही गोष्टी आपल्याला न्यात आहेत. दुर्दैवाने खालच्या सभागृहात सुद्धा संदर्भासाठी घेतो आहे. सुद्धा अध्यक्ष पद कितीकाळ रिक्त होते हे मी सांगण्याची गरज नाही. काहीतरी जादू झाली आणि खालच्या सभागृहाला अध्यक्ष मिळाले तसे आमच्या वर वेळ येऊनये कारण हे जेष्ठांचे सभागृह आहे. येथे वैचारीक विचार मंथन या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे हे रिक्त पद कधी भरले जाणार . शंभुराजे सकाळपासून चांगला किल्ला लढवत आहेत . सातारा स्टाईल मध्ये लढवत आहेत. तश्या सातारा स्टाईल मध्ये आज उद्या याचे उत्तर आले आणि माहिती मिळाली तर बरे होईल. महाराष्ट्रा बद्दल बोलले जात आहे. जे कधीही बोलले गेले नव्हते . त्याला काहीही कारण असेल मी कारण असेल परंतू या सभागृहाच्या पथा परंपरा अबाधीत ठेवणे गरजेचे आहेच परंतु त्यासाठी सरकार कडून आम्हाला माहिती मिळणे आवश्यक आहे. याबाबत मी माफक मागणी करतो

सचीन अहीर काय म्हणाले –

विधीमंडळातील अधिकार शाबूत ठेवण्यासाठी सभागृहाचा सभागृहाचा वापर करत असतो , सदस्यावरती होणारे अन्याय आणि सदस्यांच्या प्रश्नांची मांडणी आपण सभागृहात करतो. राजकारण कुठपर्यंत जाऊ शकतो हे आपण दोन ते अडीच वर्ष बघतो आहे. खालच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर ते पदच भरायचे नाही म्हणून घेऊन वारंवार शासनाने विनंती केली. तरी राज्य पालांकडून कार्यक्रम यायला पाहीजे तो आला नाही.ते राज्याने पाहीले. त्यानंतर 15 दिवसात काय चमत्कार झाला. विधान सभेच्या अध्यक्षाची निवड झाली आपल्या माध्यमातून घटने नूसरा सभापतींची निवड होणे गरजेचे आहे. हे शासन त्यांची निवड करणार का याची माहिती मिळावी ही अपेक्षा आहे.

सभापतींचे काय म्हणाल्या –

याबाबत सकाळी गटनेत्यांनी बैठकीत विषय उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्र्यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन या बाबत सभागृहाला सांगतो असे त्यांनी सांगीतल्याची माहिती सभागृहाला सभापती निलम गोऱ्हे यांनी दिली.

First Published on: August 24, 2022 5:04 PM
Exit mobile version