शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता; अजित पवारांचा आरोप

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता; अजित पवारांचा आरोप

शिंदे-फडणवीस  सरकार आल्यापासून प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस  सरकार आल्यापासून प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ( Shinde Fadnavis government came there restlessness among the officials in the administration Assembly Ajit Pawar has alleged )

प्रशासनातील अधिकारी दबावाखाली 

विधान परिषदेचे भाजपचे आमदार सुरेश धस आणि कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांच्यात काही दिवसांपूर्वी जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर त्यांनी लेखी तक्रार दिली पण तरीही काही कारवाई झाली नाही, म्हणून आता ते रजेवर गेले आहेत. असं एका पत्रकाराने अजित पवार यांना सांगितलं त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केला आहे. पवार म्हणाले की, हे आताच नाही तर हे सरकार आल्यापासून अशाप्रकारचा सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव वाढला आहे. आताच मी कोरेगावातून आलो. तिथे पीआयची पोस्ट रिकामी आहे. तिथे सध्या API आहे. तरीसुद्धा तिथे कोणीही जायला तयार नाही. त्यामुळे प्रत्येक अधिकारी हा दबावाखाली आहे. शिवसेनेचे 40 लोक आणि भाजपने जो काही सरकार आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पाहायला मिळत आहे आणि अधिकारी तसं बोलूनही दाखवतात. तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या एखाद्या अधिकाऱ्याला खासगीत विचारा तोही तुम्हाला ही अस्वस्थता सांगेल, असं अजित पवार उपस्थित पत्रकारांना म्हणाले.

शिंदे- फडणवीस सरकारला सत्तेत येऊन वर्षही झालेलं नाही, तरीही विविध स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदलांचे आदेश 10 ते 15 वेळा काढण्यात आले आहेत. त्यात आता अजित पवार यांनी अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं म्हटले आहे.

( हेही वाचा: कर्नाटक निवडणूक ; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदी-प्रियंका यांच्यात जुंपली )

रयतची आज, बैठक आहे. या बैठकीत काही बदल होण्याची शक्यता असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. काही नावांवर चर्चा होईल आणि मग निर्णय घेण्यात येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

First Published on: May 8, 2023 7:04 PM
Exit mobile version