स्नेहभोजनासाठी शिंदे, फडणवीस, पवार एकत्र येणार; डिनर डिप्लोमसी कशासाठी?

स्नेहभोजनासाठी शिंदे, फडणवीस, पवार एकत्र येणार; डिनर डिप्लोमसी कशासाठी?

मुंबई – राजकीय आखाड्यात एकमेकांविरोधात उभे ठाकणारे तीन नेते आता क्रिकेटच्या मैदानात एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची उद्या निवडणूक आहे. त्यापार्श्वभूमीवर आज बुधवारी वानखेडे स्टेडिअमवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांचे पुढारी एका व्यासपीठावर येणार आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही पक्ष एकत्र येणार आहेत.

हेही वाचा – शशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे? २४ वर्षांनंतर आज ठरणार बिगर गांधी कुटुंबातील काँग्रेसचा अध्यक्ष

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात राजकीय शिमगा सुरू आहे. राज्यातील सर्व प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप या प्रमुख पक्षांमधून आगपाखड केली जातेय. मात्र, क्रिकेटच्या मैदानात या पक्षातील काही नेते एकत्र येणार आहेत. उद्या गुरुवारी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

हेही वाचा – दिवाळी अंकांची अखंडित परंपरा!

स्नेहभोजनाच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, भाजप मुंबई अध्यक्ष आशिश शेलार आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.

First Published on: October 19, 2022 8:16 AM
Exit mobile version