शिंदे गट आणि भाजप निवडणुका एकत्र लढवणार, महापालिका निवडणुकीत युतीचे संकेत

शिंदे गट आणि भाजप निवडणुका एकत्र लढवणार, महापालिका निवडणुकीत युतीचे संकेत

मुंबई, पुणे, औरंगाबादसह अनेक महापालिका निवडणुका तोंडावर आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गट आणि भाजप आगामी महापालिका निवडुका एकत्र लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने नवी युती झाली आहे.

भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून प्राथमिक बैठक झाली असून शिंदे गटातल्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांना ते एखत्र सामोरे जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला आहे. जागावाटपाबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. औरंगाबादमधील अनेक चांगले नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हिंदुत्वासाठी एकत्र निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा जंजाळ यांनी व्यक्त केली.

शिंदे गटातील आमदार –

उदयसिंह राजपूत- कन्नड

संजय शिरसाठ- औरंगाबाद पश्चिम

रमेश बोरणारे- वैजापूर

प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद मध्य

अब्दुल सत्तार- सिल्लोड

संदिपान भुमरे- पैठण

First Published on: July 28, 2022 12:05 PM
Exit mobile version