Video शिवजन्मोत्सव; सोलापुरात १० हजार माता-भगिनींच्या उपस्थितीत पाळणा सोहळा

Video शिवजन्मोत्सव; सोलापुरात १० हजार माता-भगिनींच्या उपस्थितीत पाळणा सोहळा

सोलापूर जिल्ह्यातील भव्य शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त आज देश आणि राज्यभरात महाराजांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र रात्री एक आगळावेगळा शिवजन्मोत्सव साजरा केला गेला. मध्यरात्री १२ वाजता पाळणा झुलवत महाराजांच्या जन्माचा सोहळा साजरा केला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा जन्मोत्सव विक्रमी असा आहे. १० हजार माता-भगिनींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाळणा गीत गात छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

 

सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापुरातील सर्व समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सोलापूर शहराच्या शिवाजी महाराज चौकात असलेल्या अश्वारुढ पुतळ्याला शिव जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याचे स्वरुप देण्यात आले. त्यानंतर चौकात भगवा शामियाना उभारण्यात आला होता.

चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोर पाळण्यात बाल शिवाजींची मुर्ती ठेवण्यात आली होती. रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सर्व महिलांनी पाळणा हलवून पाळणा गीत गायले गेले. विशेष म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी ज्या सैनिकांनी हौतात्म्य पत्करले त्यांच्या विधवा पत्नींना पाळणा सोहळ्यात स्थान दिले गेले.

First Published on: February 19, 2020 11:10 AM
Exit mobile version