शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे कारच्या भीषण अपघातात निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे कारच्या भीषण अपघातात निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे या अपघातात निधन झाले आहे. वयाच्या ५२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनायक मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. (shiv sangram leader vinayak mete dead in car accident on mumbai pune express highway hospitalized at MGM navi mumbai)

माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अघातामुळे विनायक मेटे यांची प्रकृती गंभीर होती. तसेच, विनायक मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

नेमका अपघात कसा झाला?

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. महामार्गावरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडकडून मेटे मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. एका ट्रकने कट मारल्याने विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर जवळपास एक तास मदत मिळाली नाही. तसेच, 100 नंबरला फोन केला मात्र त्यांनीही फोन उचलला नाही. अथक प्रयत्नानंतर एका गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली, अशी माहिती मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

विनायक मेटे यांचा अपघात गंभीर असल्याने त्यांचे कुटुंबीय रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एमजीएमच्या रुग्णालयात दाखल होऊन मेटे यांच्या प्रकृतीची दखल घेणार आहे.


हेही वाचा – सीएनजी पुरवठा पूर्ववत करुन लोकांचा त्रास थांबवा, विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी

First Published on: August 14, 2022 7:52 AM
Exit mobile version