शिवसेनेची 2018 ची कार्यकारिणी लोकशाहीला धरूनच; अरविंद सावतांचा व्हिडीओ शेअर करत दावा

शिवसेनेची 2018 ची कार्यकारिणी लोकशाहीला धरूनच; अरविंद सावतांचा व्हिडीओ शेअर करत दावा

केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे याच्या गटाला दिलं. आयोगाच्या या निर्णयामुळे आता ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. आयोगाने आपल्या निर्णयात 2018 ची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीला धरून नसल्याचा एक मुद्दा उपस्थित केला होता. पण ही कार्यकारिणी लोकशाही पद्धतीला धरुनचं झाल्याचा दावा खासदार अरविंद सावंत यांनी थेट व्हिडीओ शेअर करत केला आहे.

अरविंद सावंत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतील सभागृहात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी विविध पदांच्या घोषणाही करत असल्याचे दिसतेय. यामध्ये लीलाधर डाके, गजानन किर्तीकर, दिवाकर रावते, मनोहर जोशी आदी ज्येष्ठ नेते दिसतायत.

यासोबत अनेक ज्येष्ठ नेते या व्हिडीओत भाषण करतानाही दिसत आहेत. यात अनेकांनी ठाकरे कुटुंबियांचं कौतुकही यात करताना दिसतायत. यावेळी खासदार गजानन किर्तीकर यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वांनी हात उंचावून मान्यता दिसल्याचं स्पष्टपणे दिसतेय.

अरविंद सावंत यांनी या व्हिडीओतून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. अरविंद सावंत म्हणाले की, देशाचा सध्या अमृतकाल सुरु आहे ती विषकाल हे आता ठरवावं लागेल. देशाच्या सर्वोच्च घटनेलावरचं निवडणूक आयोगाने घाव घातला आहे. मग कशाला घटनेत परिशिष्ट 10 समाविष्ट केलं? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच आम्ही आमच्या कार्यकारिणी निवडीचं पत्र 4 एप्रिल 2014 ला निवडणूक आयोगाकडे सादर केलं पण आयोगाने धादांत खोट सांगितलं की आम्ही दिलचं नाही, असही सावंत म्हणाले.


ठाकरे गटातील मराठवाड्यातील आणखी एक खासदार शिंदे गटाच्या वाटेवर


First Published on: February 18, 2023 2:32 PM
Exit mobile version