शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आम्हा सर्वांचीच – आदित्य ठाकरे

शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आम्हा सर्वांचीच – आदित्य ठाकरे

‘शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे. जे गेलेत ते गद्दार आहेत’, अशा शब्दांत आजच्या निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सुनावणीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचं यावर सुनावणी सध्या सुरू आहे. ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे वकिलांकडून युक्तीवाद केला जात आहे. (Shiv Sena Balasaheb Thackeray Uddhav Thackeray and all of us says Aaditya Thackeray)

निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. “शिवसेना कोणाची हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा प्रश्नच उद्भावत नाही. शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे. जे गेलेत ते गद्दार आहेत”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

याशिवाय, “बुधवारी महापालिकेच्या प्रशासन आणि प्रशासकाने एक परिपत्रक काढले. त्यामध्ये रस्त्याचे टेंडर आहेत. वरचढ बोली होती. पालिकेने जे टेंडर काढले होते. त्याच्यावर वाटाघाटी करण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्टर आले नव्हते. त्यामुळे आता ही स्थिती असेल, तर पुढे हे कॉन्ट्रॅक्टर महापालिकेचे ऐकणार नाहीत. हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरला किती आण कोणती कामं मिळाली आहेत, याची काहीच माहिती नाही. यावर अद्याप घटनाबाह्य असलेले मुख्यमंत्री काहीच बोललेले नाहीत. कदाचीत ते मला सहमत असतील”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – मोठी बातमी! उदय सामंत यांच्या बोटीचे इंजिन भर समुद्रात बंद, स्वीय सहायकाकडून प्रसंगावधान

First Published on: January 20, 2023 8:38 PM
Exit mobile version