घरमहाराष्ट्रमोठी बातमी! उदय सामंत यांच्या बोटीचे इंजिन भर समुद्रात बंद, स्वीय सहायकाकडून...

मोठी बातमी! उदय सामंत यांच्या बोटीचे इंजिन भर समुद्रात बंद, स्वीय सहायकाकडून प्रसंगावधान

Subscribe

Uday Samant Accident | भर समुद्रातच हा प्रकार घडल्याने कोणाच्या मोबाईललाही रेंज नव्हती. उदय सामंत यांचे स्वीय सहाय्याकांनी त्यांच्या मोबाईलला कमी रेंज असतानाही रेस्क्यूसाठी संपर्क साधला.

मुंबई – राज्यात नेत्यांच्या अपघातांच्या घटना सुरू असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा मोठ्या अपघातातून बचावले आहेत. मांडवाहून मुंबईत येताना ते प्रवास करत असलेली स्पीड बोट अचानक बंद पडली. बोटीमधील सर्व यंत्रणा अचानक बंद पडल्याने कॅप्टनला रेस्क्यूसाठी आपत्कालीन संदेशुद्धा पाठवता येत नव्हता. मात्र, लागलीच दुसरी स्पीड बोट आल्याने मोठे संकट टळले आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया असा स्पीड बोटीने प्रवास करत होते. मात्र, अचानक स्पीड बोटीचे इंजिन बंद पडले. यामुळे बोटीतल्या सर्व यंत्रणा बंद पडल्या. यंत्रणा बंद पडल्याने कॅप्टनला तत्काळ SOS हा आपत्कालीन संदेशही सुरक्षा यंत्रणांना पाठवता येत नव्हता. दरम्यान, भर समुद्रातच हा प्रकार घडल्याने कोणाच्या मोबाईललाही रेंज नव्हती. उदय सामंत यांचे स्वीय सहाय्याकांनी त्यांच्या मोबाईलला कमी रेंज असतानाही रेस्क्यूसाठी संपर्क साधला. त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना रेस्क्यू करण्याकरता तत्काळ दुसरी स्पीड बोट मागवण्यात आली. काही वेळातच ही दुसरी स्पीड बोट घटनास्थळी दाखल होत उदय सामंत यांना सुखरूप गेट वे ऑफ इंडियाला आणण्यात आले.

- Advertisement -

माजी मंत्री दीपक सावंत यांच्या गाडीलाही अपघात

पालघर येथील आश्रमशाळेत एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यूबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी डॉ. सावंत हे शुक्रवारी सकाळी पालघरला जात होते. त्यांची कार काशिमीरा येथे आली तेव्हा मागून एका डंपरने कारला धडक दिली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. डॉ. सावंत यांच्या मानेला व पाठिला दुखापत झाली. अहमदाबाद महामार्गावर काशिमिरा परिसरातील सगणाई माता मंदिर चौक येथे हा अपघात झाला. डंपर चालकाला काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले. सावंत हे स्वतःच रुग्णवाहिकेने मुंबई येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. या घटनेतील दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अशी काशीमिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -