विधान परिषदेत राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, सचिन अहिर यांचा निर्धार

विधान परिषदेत राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, सचिन अहिर यांचा निर्धार

सचिन अहिर

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला काही वेळातं सुरुवात होणार आहे. यासाठी निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली. यात राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी सरकारला पराभवची धूळ चारली. त्यामुळे फडणवीसांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारला पराभव करण्याचा चंग बांधला आहे. मात्र काही झालं तरी महाविकास आघाडी सरकार जिंकणार असा आत्मविश्वास सरकारमधील नेत्यांकडून व्यक्त होतोय. यात आता शिवसेनेकडून विधान परिषदेच्या मैदानात उतरलेले सचिन अहिर यांनीही आज “विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ देणार नाही,” असा निर्धार केला आहे. विधानभवनाबाहेर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

यावेळी बोलताना सचिन अहिर म्हणाले की, “महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ते कशापद्धतीने काय आहे ते सांगायची गरज नाही, सर्व लोकांना याची माहिती आहे. पण त्याची पुनरावृत्ती आम्ही होऊ देणार नाही याची खात्री आहे. सर्व आमदार पूर्ण ताकदीने महाराष्ट्राची संस्कृती जतन करत असतात…कारण जे चिन्हावर निवडणूक येणारे लोकं आहेत ते पूर्ण प्रामाणिकपणे मतदान करत सर्वांना निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

…म्हणून निवडणुकीला सामोरे जावे लागतेय

“शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनामुळे आमशा पाडवी आणि माझा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे निश्चित खात्री आहे की, विजय फक्त आमच्या दोघांचा नाही तर महाविकास आघाडीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. या निवडणुकीची पण गरज होती का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण महाविकास आघाडीची संख्या पाहिल्यानंतरही या प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाने दुर्दैवाने पाचवा उमेदवार दिल्याने याचा सामोरे जाव लागत आहे, असही सचिन अहिर म्हणाले.

“प्रत्येक पक्षाची एक रणनिती असते. ही रणनिती शेवटाला मोजली जाते. गेल्या दोन दिवस सर्व पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवत आपली रणनिती ठरवली आहे. एका बाजूला पक्षाच्या आमदारांची रणनिती सुरु असताना सर्व नेते मंडळींची वेगळी रणनिती सुरु होती. शेवटी काल सर्व नेते मंडळी एकमेकांच्या संपर्कात होते एकमेकांना भेटले. मुख्यमंत्र्यांनीही पक्षाच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांचे प्रतिनिधी आमच्या संपर्कात होते. आज हीच रणनिती ओपन करण्याचे काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व नेते मंडळी करणार आहेत”, असा खुलासाही अहिर यांनी केला.

“महाविकास आघाडीचे सर्व नेते निवडून यायला हवेत. आमचा पूर्ण प्रयत्न आहे प्रयत्न नाही तर आत्मविश्वास आहे की, महाविकास आघाडीतील सर्व नेते आणि राष्ट्रवादीचे इतर उमेदवार आहेत ते सर्व एकत्र निवडून येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीचे सर्व नेते निवडून येतील – आमशा पाडवी

“मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास ही माझ्य़ासाठी अभिमानाची बाब आहे. मी एक सामान्य शिवसैनिक आहे. आदिवासी समाजाची मी एक प्रतिनिधी आहे. विधान सभेच्या स्थापनेपासून कोणत्याही पक्षाने एका आदिवासी उमेदवाराला संधी दिली असे मला वाटत नाही. मला आत्मविश्वास आहे, महाविकास आघाडीचे सर्व नेते निवडणून येतील,” असा विश्वासही निवडणुकीच्या रंगणात असलेले शिवसेनेचे दुसरे उमेदवार आमशा पाडवी यांनी व्यक्त केला आहे.


महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा

First Published on: June 20, 2022 9:22 AM
Exit mobile version