‘केंद्र सरकार करतय पडद्यामागून राजकारण’

‘केंद्र सरकार करतय पडद्यामागून राजकारण’

शिवसेना नेते संजय राऊत

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तीन कृषी कायद्याविरोधात आज दिल्लीत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. एकीकडे देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दिल्ली मात्र, तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाला लागलेल्या गालबोटावर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘केंद्र सरकार पडद्यामागून राजकारण करत आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे संजय राऊत यांनी केंद्र सरकारला ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

काय म्हणले संजय राऊत?

“दिल्लीत सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे, याचे कोणीही समर्थन करत नाही. तसेच लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही. पण, वातावरण का बिघडले? सरकार शेतकरी विरोधी कायदे का रद्द करत नाही? केंद्र सरकार अदृश्य राजकारण का करत आहे? जर सरकार हवे असते, तर आजचा हिंसाचार थांबवता आला असता”, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

बैठका झाल्या निष्फळ

“नव्या कृषी कायद्याविरोधात आतापर्यंत १० ते १२ बैठका झाल्या. पण, या सर्व बैठका निष्फळ ठरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी याआधीच सांगितले होते की येत्या २६ जानेवारी रोजी आम्ही आंदोलन करणार आहोत. त्याप्रमाणे त्याठिकाणच्या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सुरक्षेच्यादृष्टीकोनातून खबरदारी घ्यावी लागते. मात्र, सध्या दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर का करण्यात आला याचे मलाही कारण माहित नाही. माझ एकच म्हणणे आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. केंद्राने एवढी टोकाची भूमिका घेऊ नये”.


हेही वाचा – ‘केंद्राने टोकाची भूमिका घेऊ नये’


 

First Published on: January 26, 2021 4:03 PM
Exit mobile version