ED Raids In Mumbai: ईडी छापेमारीत नेत्यांची नाव येतील की घुसवली जातील हे सांगता येत नाही – संजय राऊत

ED Raids In Mumbai: ईडी छापेमारीत नेत्यांची नाव येतील की घुसवली जातील हे सांगता येत नाही – संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणात आहे. पण त्यापूर्वी ईडी मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणांवर ईडीचे सध्या धाडसत्र सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या कराराबाबत मुंबईत ईडीची छापेमारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. आता ईडी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या घरी दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘आता ईडीच्या छापेमारीत नेत्यांची नाव समोर येतील की घुसवली जातील हे काही सांगता येत नाही.’

तपास यंत्रणांना सहकार्य करणे गरजेचे – राऊत

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील आणि काही गंभीर गोष्टी असतील, तर केंद्रीय यंत्रणांना सहकार्य करणे गरजेचे आहे. अशा कारवाईत केंद्राने आणि राज्याने एकत्रितपणे काम करायला हवे. पण या ईडीच्या छापेमारीत नेत्यांची नाव समोर येतील की नाव घुसवली जातील? हा एक महाराष्ट्रात, बंगालमध्ये, झारखंडमध्ये आणि छत्तीसगढमध्ये प्रश्न चिन्ह आहे. पण आता त्याच्यावरती मी जास्त काही बोलणार नाही.’

नक्की वाचा – ED NIA Raid : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांवर ED, NIA ची संयुक्त छापेमारी, राजकीय नेताही रडारवर

पुढे राऊत म्हणाले की, ‘ईडी देशासाठी बनली आहे, कोणत्याही राजकीय पक्षासाठी नाही. गुजरातमध्ये एवढा मोठा बँक घोटाळा झाला आहे. देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा आहे. ईडी तिथे केव्हा जाते, याकडे आमचे लक्ष आहे. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. ईडीने तिथेही जाऊन हा घोटाळा दाबण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून कोणी प्रयत्न केला? याप्रकरणी दोन वर्षांपासून साधा एफआयआरसुद्धा होऊ न देणारे लोकं कोण होते? यामध्ये कोणाचा सहभाग होता? लोकांना पळण्यासाठी मुख्य आरोपी त्यामध्ये कोण होते? ते कसे पळाले? याचा अधिक तपास करण्यासारखे आहे.’


हेही वाचा – सर्वात मोठा बँकिंग घोटाळा! ABG शिपयार्डविरोधात FIR, 28 बँकांची 22,842 कोटींची फसवणूक


First Published on: February 15, 2022 10:58 AM
Exit mobile version