शिवसेना कोणाची? संजय राऊतांनी दिली पुराव्यांची यादी

शिवसेना कोणाची? संजय राऊतांनी दिली पुराव्यांची यादी

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले त्यासोबतचं शिवसेनेतही मोठी फुट पडली. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचा वेगळा गट निर्माण झाला. यात शिवसेनेचे अनेक निष्ठावंत आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी होत आहेत. अशात शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावरचं दावा केला जात आहे. यासंदर्भात न्यायालयीन सुनावणी सुरु असून दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश देणयात आले आहे. याच पुराव्यांवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी यासारख महाराष्ट्राच दुर्दैव काय? असा असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना कोणाची? म्हणत राऊतांनी पुराव्यांची मोठी यादीत सांगितली आहे.

हे पाप बंडखोरांना फेडावे लागेल

राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आहेत. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत. मराठी माणसाच्या ह्रदयात शिवसेना स्थान आहे आणि आमच्यावरती आज तुम्ही पुरावे सादर करण्याची वेळ आणता, हे पाप तुम्हाला फेडावे लागेल. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातले आहेत, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले आहे आणि ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणली आहे. त्यांना या राज्याची जनता माफ करणार नाही. आई जगदंबा माफ करणार नाही आणि नियती माफ करणार नाही.

राऊतांनी सांगितली पुराव्यांची यादी 

पुरावे काय? या महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हाच पुरावा आहे. पुरावा काय पाहिजे? सीमा प्रश्नासाठी मेलेली आमची हुतात्मे हा पुरावा आहे. पुरावा काय पाहिजे? हजारो आंदोलनातून आमचा शिवसैनिक, मराठी माणूस शहीद झाला, तुरुंगात गेला हा पुरावा आहे. 1992 च्या दंगलीमध्ये आमच्यासह हजारो लोक मारले गेले, शहीद झाले हा पुरावा आहे… या महाराष्ट्राच्या माती- मातीमध्ये, कणा-कणामध्ये, मराठी माणसाच्या रक्तात मनगडात शिवसेना आहे हा पुरावा आहे… पैसे देऊन, दहशतीने दहा वीस लोकं फोडले, हा पुरावा होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना पुढे चालत आहे. आणि शिवसेनेचा पुरावा काय आहे … हे राज्यातील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही… ठीक आहे.. निवडणूक आयोग.. किंवा इतर यंत्रणा काय आहेत आपल्याला माहित आहे. असही राऊत म्हणाले.

लोकसभा अध्यक्षांना राऊतांचा सवाल 

शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना तीन वेळा पत्र लिहिले मात्र त्याचं उत्तर दिले नाही. पण एक फुटीर गट जातो, आमचा गट खरा सांगतो आणि त्यांना 24 तासात मान्यता दिली जाते. तुम्ही कोणते पुरावे सादर करणार आणि सत्याचा खून होत असताना कोणते पुरावे करण्याच्या गोष्टी करता? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.


उद्धव ठाकरे शिंदे गटाला राजकारणातून उठवणार, संजय राऊतांचा इशारा


 

First Published on: July 23, 2022 11:18 AM
Exit mobile version