शिवसेना कोणाची? चिन्हवादाबाबत १२ डिसेंबरला होणार सुनावणी

शिवसेना कोणाची? चिन्हवादाबाबत १२ डिसेंबरला होणार सुनावणी

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि काही खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी उभी फूट पडली. या फुटीनंतर आता शिवसेना कोणाची हा राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेनेचं चिन्ह कोणत्या गटाला मिळणार यावर अजून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र या चिन्हासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ( उद्धव ठाकरे), बाळासाहेबांच्या शिवसेना गटाकडे (एकनाथ शिंदे गट) निवडणूक आयोगाने कागदपत्रे मागवली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेच्या चिन्हावरील वादावर 12 डिसेंबरला सुनावणी करणार आहे.

शिवसेना चिन्ह वादावर १२ डिसेंबरला होणार सुनावणी?

केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेच्या चिन्हावरील वादावर 12 डिसेंबरला सुनावणी करणार आहे अशी माहिती समोर येत आहे. सेनेच्या निवडणूक चिन्ह वादावरील ही पहिली सुनावणी असेल. ठाकरे गट आणि शिंदे गटाला यासाठी आपापली कागदपत्रे आणि निवेदने 9 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला आयोगाने शिवसेनेच्या गटांना पक्षाचे नाव आणि चिन्हावरील दावा मागे घेण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत नवीन कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. ईसी पॅनेलने त्यांना आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची एकमेकांशी देवाणघेवाण करण्यास सांगितले होते.

अंधेरी पूर्व विधानसभेत काय घडले?

अंधेरी पूर्व विधानसभा जागेवर आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ऋतुजा लटके (ठाकरे गट) यांनी या जागी उमेदवारी अर्ज भरला. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवले होते. त्यानंतर दोन्ही गटांना स्वतंत्र नावे व चिन्हे देण्यात आली. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देत मशाल हे चिन्ह दिले. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देत ढाल-तलावर हे चिन्ह निवडणू आयोगाने दिले. या चिन्हावरच ठाकरे गटाने अंधेरी पूर्व विधानसभा जागेवरील निवडणूक लढत आपले स्थान निश्चित केले.


महाराष्ट्रात ‘सिनार्मस’ची दोन टप्पांत २० हजार कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री शिंदेंचे उद्योगांना राज्यात गुंतवणुकीचे आवाहन

First Published on: November 29, 2022 7:57 PM
Exit mobile version