शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये मोजक्याच नेत्यांच्या उपस्थित होणार

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये मोजक्याच नेत्यांच्या उपस्थित होणार

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. ५० टक्के उपस्थितीतीसह हा दसरा मेळावा पार पडणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा दादारच्या बाहेर होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा १०० टक्के होत आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये दसरा मेळावा होईल. त्या जोरात, त्या जोशात व्यवस्थित होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील. देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही, अशी माहिती दिली होती. कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ऑनलाईन पद्धतीने पार पडला. दरम्यान, राऊतांनी ऑनलाईन होणार नसल्याचे संकेत दिल्याने हा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, यंदाचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावर न होता षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. मिळालालेल्या माहितीनुसार १५०० जणांची परवानगी देण्यात आली आहे. संध्याकाळी ५.३० वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे.

 

First Published on: October 11, 2021 10:33 AM
Exit mobile version