…तो उसे भुला नहीं कहते, बंडखोर आमदारांच्या परतीबाबत संजय राऊत आशावादी

…तो उसे भुला नहीं कहते, बंडखोर आमदारांच्या परतीबाबत संजय राऊत आशावादी

२१ जूनपासून राज्यात सुरू झालेलं सत्तानाट्य अखेर संपलं आहे. मात्र, राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही कमी झाल्या नाहीत. दरम्यान, शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले आमदार पुन्हा शिवसेनेत परतील अशी आशा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे. (Shivsena leader sanjay raut says rebel mlas will come back into the party)

हेही वाचा संजय राऊतांमुळे ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले, शंभूराज देसाईंचा आरोप

संजय राऊत म्हणाले की, काही आमदारांना फसवण्यात आलं आहे, त्यामुळे ते परत येतील. ते सुद्धा आमचेच लोक आहेत. सुबह का भुला शाम को लौट आए तो उसे भुला नहीं केहते, असं म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांच्या परतीबाबत आशा ठेवली आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, “आम्ही मध्यावधी निवडणुकींसाठी तयार आहोत, पण ते तयार आहेत का? जर आता निवडणुका झाल्या तर आम्ही १०० पेक्षा जास्त जागा मिळवू. उद्धव ठाकरेंनीही मध्यावधी निवडणुका होऊदेत असं म्हटलं आहे. त्यामुळे कोण हरेल आणि कोण जिंकेल हेही समजेल.”

हेही वाचा – शिंदे गटात खासदार गेल्यावर विश्वप्रवक्ते कोणत्या शब्दांचा वापर करणार?, मनसेचा राऊतांवर घणाघात

पैशांव्यतिरिक्त या बंडखोर आमदारांना आणखी काहीतरी मिळालं असेल असंही संजय राऊत म्हणाले. पण नेमकं काय दिलंय ते समोर आलं तर मोठा खुलासा होऊ शकतो, असं राऊत म्हणाले. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्यामुळे ती दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही. पैशांच्या माध्यमातून तुम्ही शिवसेना विकत घेऊ शकत नाहीत.

व्हिपविरोधात मतदान केल्याने शिंदे गटाने शिवसेनेतील १४ आमदारांना नोटीस पाठवली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, “त्यांना नोटीस पाठवू द्या, ती एक प्रक्रियाच आहे. आदित्य ठाकरे यांना वगळून इतर १४ आमदारांना नोटीस का पाठवण्यात आली ते माहित नाही. पण ज्यांना नोटीस पाठवली आहे ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत.”

First Published on: July 6, 2022 3:42 PM
Exit mobile version