कसबा, चिंचवड जागा सुद्धा मविआ एकत्रित लढणार; आमचा राजकीय शत्रू एकचं; संजय राऊतांचं विधान

कसबा, चिंचवड जागा सुद्धा मविआ एकत्रित लढणार; आमचा राजकीय शत्रू एकचं; संजय राऊतांचं विधान

अमरावती आणि नागपूर या महत्त्वाच्या जागा महाविकास आघाडीने जिंकल्या त्या महाविकास आघाडीच्या एकीमुळे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा सुद्धा महाविकास आघाडीसुद्धा एकत्रित लढेल, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रु एकचं आहे, त्यांचा पराभव व्हायला पाहिजे आणि विधानपरिषद निवडणुकीत तो करुन दाखवलं, असही राऊत म्हणाले. संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलत होते.

कसबा आणि चिंचवड जागा मविआ एकत्र लढणार

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, विधानपरिषदेच्या पाच मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत नागपूरमधून ठाकरे गटाचा उमेदवार दिला होता. पण मविआ आघाडी म्हणून जिंकायचं असं ठरल्यावर शिवसेनेने वारंवार त्यागाची भूमिका घेतली की, आपल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं नुकसान झालं नाही पाहिजे. आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रु एकचं आहे, त्यांचा पराभव व्हायला पाहिजे आणि विधानपरिषद निवडणुकीत तो करुन दाखवलं. पाचपैकी चार जागा महाविकास आघाडीकडे आहेत आणि एक जागा भाजपने जिंकली, अमरावती आणि नागपूर या महत्त्वाच्या जागा महाविकास आघाडीने जिंकल्या त्या आमच्या एकीमुळे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा सुद्धा महाविकास आघाडीसुद्धा एकत्रित लढेल, असही राऊत म्हणाले.

मविआमध्ये कोणतेही मतभेद, रस्सीखेच नाही

चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका आहे, आग्रह आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ. या दोन्ही ठिकाणी जिंकण्याची संधी सगळ्यात जास्त कोणाला हे ठरवलं जाईल आणि त्यानुसार ठरवलं जाईल. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद, रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीने जिंकण हे आमचं एकमेव ध्येय आहे. अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही जिंकलो तेव्हाही आम्हाला पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकीत आम्ही एकमेकांना मदत केली. चिंचवड आणि कसबा निवडणुकीतही आम्ही त्याच जोशाने आम्ही लढू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.


शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच भाजपचा अमरावतीत पराभव; संजय गायकवाडांचं मोठ विधान

First Published on: February 4, 2023 10:58 AM
Exit mobile version