अपात्र व्हायचं नसेल तर त्यांना मलाच मतदान कराव लागेल – आमदार राजन साळवी

अपात्र व्हायचं नसेल तर त्यांना मलाच मतदान कराव लागेल – आमदार राजन साळवी

शिवसेनेचे आमदार गोव्यात असल्यामुळे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून त्यांना ई-मेलद्वारे व्हीप जारी करण्यात आला आहे. तो व्हीप त्यांना लागू होतो. परंतु तो व्हीप लागू होतो, असं म्हटल्यानंतर त्यांना अपात्र व्हायचं नसेल तर त्यांना मतदान हे मलाच करायला लागेल. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी निवडून येणार, असं शिवसेनेचे आमदार राजन साळवी म्हणाले.

राजन साळवी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जी लोकं आमदार मंडळी आमच्यापासून दूर गेलेली आहेत. त्यांनाही शिवसेनेच्या पक्ष प्रतोदांनी व्हीप जारी केलेला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानामध्ये मला खात्री आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार मला मतदान नक्की करतील. त्यामुळे मी जवळपास १६० आकड्यांच्या वर जाईल, असा विश्वास मला आहे. त्यामुळे मी निवडून येईल, असं साळवी म्हणाले.

शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार जर गोव्यातून मुंबईला येत आहेत. त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने पक्षाची ध्येयधोरणं ठरतील. विधानसभेत सुद्धा आम्ही त्यांना दाखवून देऊ. आज शिवसेनेचे १६ आमदार जरी महाविकास आघाडीशी निगडीत राहिले असले तर संख्याबळ म्हणून ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित होणार आहे. असे तुम्हाला मी ठामपणे सांगतो, असं साळवी म्हणाले.


हेही वाचा : साळवींना मतदान करण्यासाठी सेनेकडून आमदारांना व्हीप जारी, शिंदे गटाची भूमिका काय?


 

First Published on: July 2, 2022 7:36 PM
Exit mobile version