संजय राऊतांना पुन्हा जेल की बेल! जामीन अर्जावर आज सुनावणी

संजय राऊतांना पुन्हा जेल की बेल! जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी आज संपत असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी त्यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय राऊतांना जेल मिळणार की बेल मिळेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ईडीने अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने संजय राऊतांविरोधात पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले, याप्रकरणी आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. यानंतर राऊतांना बेल मिळणार की जेल याबाबत निर्णय होईल. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांविरोधात आरोपपत्र दाखल केले, यामध्ये ईडीने म्हटले की, पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊतांचा केवळ सहभाग नसून त्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे. पडद्याआड राहून राऊतांनी काम केल्याचे पुरावे ईडीला सापडल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. दरम्यान संजय राऊतांनी जामीनाला विरोध करत ईडीसमोर म्हटले की, राऊत हे एक राजकीय व्यक्तिमत्त्व असल्याने बाहेर येत ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. त्यामुळे तपास महत्त्वाच्या टप्प्यात असताना जामीन देणं योग्य ठरणार नाही.

गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीने अटक केली, यानंतर प्रथम त्यांना ईडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हपासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. दरम्यान राऊतांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालातील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला, यावेळी न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. दरम्यान आज राऊतांची न्यायालयीन कोठडी संपतेय. त्यामुळे आज मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा त्यांच्या अर्जावर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड महिन्यांच्या काळानंतरही संजय राऊतांना जामीन मिळालेला नाही म्हणून आजच्या सुनावणीला विशेष महत्व आहे.


चंदीगड युनिव्हर्सिटी व्हिडीओ कांडप्रकरणी विद्यार्थी पुन्हा आक्रमक; युनिव्हर्सिटी 6 दिवस बंद


First Published on: September 19, 2022 11:34 AM
Exit mobile version