घरदेश-विदेशचंदीगड युनिव्हर्सिटी व्हिडीओ कांडप्रकरणी विद्यार्थी पुन्हा आक्रमक; युनिव्हर्सिटी 6 दिवस बंद

चंदीगड युनिव्हर्सिटी व्हिडीओ कांडप्रकरणी विद्यार्थी पुन्हा आक्रमक; युनिव्हर्सिटी 6 दिवस बंद

Subscribe

नवी दिल्ली : चंदीगड युनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याचा खुलासा झाल्यानंतर रविवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी संबंधिक आरोपी विद्यार्थीनी आणि तिच्या प्रियकराला शिमलातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान या घटनेतील आरोपींना अटक झाल्यानंतर युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील आक्रमक विद्यार्थी शांत झाले. मात्र रविवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे युनिव्हर्सिटी व्यवस्थापन आणि पोलिसांमध्ये खळबळ उडाली. सोमवारी सकाळपासूनचं कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण होते. यामुळे कॅम्पसमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युनिव्हर्सिटी प्रशासनाने वसतिगृहाच्या दोन वॉर्डनना निलंबित केले आहे. तर युर्निव्हर्सिटी सहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मुलींच्या कपड्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ले कार्बोइसर हॉस्टेलच्या वॉर्डन राजविंदर कौरला युनिव्हर्सिटी प्रशासनाने निलंबित केले आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

या घटनेमुळे वसतिगृहातील काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. मात्र युनिव्हर्सिटी प्रशासन आणि पलिसांकडून ही माहिती खोटी असल्याचे सांगण्यात आले, त्याचवेळी एका बेशुद्ध अवस्थेतील मुलीला अॅम्ब्युलन्समधून नेतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. दुसरीकडे विद्यापीठ व्यवस्थापन कॅम्पसमधील विद्यार्थ्यांवर या प्रकरणी कोणतेही वक्तव्य न करण्यास दबाव टाकत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान रविवारी सायंकाळी युनिव्हर्सिटी परिसरात शेकडो विद्यार्थ्यांनी पुन्हा घेराव घावून रास्ता रोको केला, तसेच युनिव्हर्सिटीच्या गेटबाहेर ठिय्या आंदोलन केले. अशा परिस्थितीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली तसेच युनिव्हर्सिटी प्रशासनासमोरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, यावेळी अॅम्ब्युलन्समधून घेऊन जाणाऱ्य़ा विद्यार्थिनीच्या प्रकृतीबाबत विद्यार्थी प्रश्न उपस्थित करत होते. यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने आंदोलनावर बसलेल्या विद्यार्थिनींना सांगितले की, न्याय मिळावा म्हणून ते आंदोलन करत असलेली मुलगी पूर्णपणे ठीक आहे.

- Advertisement -

त्यावर आंदोलक म्हणाले की, आधी त्या विद्यार्थिनीला आमच्यासमोर आणा. यानंतर मुलीला घटनास्थळी बोलावून तिने सर्वांसमोर आपली बाजू मांडली. त्यावर विद्यार्थ्यांवर दबाव टाकून हे वक्तव्य केले जात असल्याचा आवाज विद्यार्थ्यांच्या जमावातून आला. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मुलीला अटक करण्यात आली आहे, याची आधी खात्री द्या, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यावर घटनास्थळी उपस्थित असलेले मोहालीचे डीसी मोहाली यांनी याप्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली असून एसआयटीही स्थापन करण्यात आल्याचे आश्वासन दिले. लवकरच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. मात्र रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.


मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आढळला मृतावस्थेत बिबट्या; शिकारीची शक्यता वनविभागाने नाकारली


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -