Sanjay Raut vs Kirit Somaiya: EDची धमकी देऊन १०० कोटींचा फ्लॅट मातीमोल भावात सोमय्यांनी मित्राच्या नावावर केला – संजय राऊत

Sanjay Raut vs Kirit Somaiya: EDची धमकी देऊन १०० कोटींचा फ्लॅट मातीमोल भावात सोमय्यांनी मित्राच्या नावावर केला – संजय राऊत

...म्हणून आम्ही नीलच्या अटकपूर्व जामीन अर्जासाठी कोर्टात केली याचिका, सोमय्यांनी स्पष्टच 'सांगितलं'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानसोबत किरीट सोमय्याच्या कुटुंबाचे संबंध असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. तसेच आज सकाळी ट्विट करून राऊतांनी बाप बेटे जेलमध्ये जाणार, वेट अँड वॉच. कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे असे म्हटले होते. त्यानंतर आज किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. वाधवानसोबत सोमय्या कुटुंबांचे कोणतेही संबंध नसून आमची खुशाल चौकशी करा, असे प्रतिआव्हान सोमय्यांनी केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सोमय्यांवर गंभीर आरोप केला आहे. ईडीची धमकी देऊन १०० कोटींच्या फ्लॅट मातीमोल भावात किरीट सोमय्यांनी मित्राच्या नावावर केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

नक्की काय म्हणाले संजय राऊत?

‘या मुंबईतले बिल्डर्स, व्यापारी यांच्याकडून ईडीच्या नावाने धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी आतापर्यंत शेकडो कोटी गोळा केले आहेत. त्यातला किती टक्के ईडीकडे गेलाय हे सोमय्या बाहेर सांगतात. ८ जेव्हीपीडी स्कीम, एक सुजित नवाब नावाचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट किरीट सोमय्या आणि त्यांचा मित्र बिल्डर अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा फ्लॅट या लोकांनी मातीमोल भावात अमित देसाईच्या नावावर करून घेतला. तसेच यातले १५ कोटी रुपये किरीट सोमय्यांनी कोणत्या ईडीच्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हे ईडीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट करावं नाही तर मी त्याचे नावा घेईन,’ अशा इशारा राऊतांनी दिला आहे.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार

पुढे राऊत म्हणाले की, ‘१९ बंगले कुठे आहेत? व्यवस्थेच्या जमिनी कुठे आहेत? राऊतांची बेनामी प्रॉपर्टी कुठे आहे? अर्जुन खोतकरांना त्रास का दिलासा जातो? भावना गवळी आणि आनंदराव अडसुळे यांचा काय गुन्हा आहे? असे माझे प्रश्न आहे. एक दूधवाला महाराष्ट्रात येतो, तिथल्या सरकारमधील पैसे आपल्या धंद्यात गुंतवतो. ७ हजार कोटींचा मालक होतो उत्तर द्या. अमोल काळे कुठे आहे? काय व्यवहार आहेत त्यांच्यासोबत? येऊ द्या समोर नाही तर आम्ही समोर आणू. तुम्ही आमचा अंत बघू नका. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार.’


हेही वाचा – Sanjay Raut vs Kirit Somaiya : निकॉन इन्फ्रामध्ये PMC ची दमडीही नाही, राकेश वाधवान पार्टनर नाही, किरीट सोमय्यांचा खुलासा


 

First Published on: February 16, 2022 11:16 AM
Exit mobile version